नवी दिल्लीः स्मार्टफोनच्या बाजारात टॉपवर असलेल्या कंपनीला भारतात व्यापार करून पाच वर्ष पूर्ण होत आहेत. पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स देऊ केल्या आहेत. पहिल्यांदा कस्टमर्सला फॅन म्हणत शाओमीनं कम्युनिटी ट्रेंड सुरू केला आहे. ग्राहकांना शाओमी कंपनी स्वस्तात फोन देणार आहे. च्या लाँचसोबत ५०० कोटी रुपयांचा फायदा ग्राहकांना पोहोचवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. शाओमी रेडमी ८ चा ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनच्या किंमतीत ग्राहकांना ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन मिळणार आहे. शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ही माहिती देताना त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. काही फोटो शेअर करीत त्यांनी म्हटलेय की, ही वेळ एका मोठ्या सरप्राइजची आहे. तुम्ही आम्हाला पाच वर्षात बरेच काही दिले आहे. त्यामुळे आम्ही त्या बदल्यात तुम्हाला ५०० कोटी रुपये परत करण्याचे ठरवले आहे. रेडमी ८ च्या आधी ५० लाख ग्राहक (पहिले) यांना ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन केवळ ७ हजार ९९९ रुपयांना देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. ज्या ग्राहकांनी ३ जीबी रॅमचा फोन ऑर्डर केला आहे. त्या सर्वांच्या फोनमध्ये ४ जीबी रॅमचे अपग्रेड करण्यात येईल. पाच वर्ष साथ दिल्याबद्दल त्यांनी ग्राहकांचे आभार मानले आहे. मनु कुमार यांच्या ट्विटनंतर शाओमीच्या ग्राहकांमध्ये आनंद पसरला आहे. काही वेळातच #4GB64GB हे ट्रेंडमध्ये होते. काही ग्राहकांनी पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शाओमी इंडिया कंपनीला शुभेच्छा दिल्या. तर काही ट्विटर युजर्सने लिहिले की, ५० लाख फोन विकायला किती वेळ लागेल. रेडमी ८ च्या स्मार्टफोनमध्ये ६.२२ इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. ३ जीबी रॅमच्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये तर ४ जीबी रॅमच्या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये इतकी आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33gvg2Q
Comments
Post a Comment