जीओ फायबर की बीएसएनएल? कोणता प्लान चांगला

नवी दिल्ली :रिलायन्स जिओफायबरच्या एंट्रीनंतर ब्रॉडब्रॅण्ड सेक्टरमध्ये मोठे बदल घडले असून स्पर्धा तीव्र झाली आहे. जिओ फायबरला टक्कर देण्यासाठी इतरही ब्रॉडब्रॅण्ड कंपन्यांनी आपले नवीन प्लान आणले आहेत. बीएसएनएलदेखील या स्पर्धेत उतरली असून मागील काही महिन्यात आपले नवीन प्लान लाँच केले आहेत. त्याशिवाय काही प्लानमध्ये बदलही केले आहेत. रिलायन्स जिओ ब्रॉडब्रॅण्डच्या २४९९ रुपयांच्या प्लानला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलनेदेखील आपला २४९९ रुपयांचा प्लान लाँच केला आहे. २४९९ रुपयांचा प्लान जिओ फायबरच्या या डायमंड प्लानमध्ये ५०० एमबीपीएसचा स्पीड देण्यात आला आहे. त्याशिवाय वेबसाइटनुसार, या प्लानमध्ये १२५० जीबी डेटा देण्यात आला आहे. त्याशिवाय या प्लानमध्ये युजर्सना २५० जीबी डेटा अतिरिक्त देण्यात आला आहे. त्यामुळे हा प्लान घेणाऱ्या युजर्सना एकूण १५०० जीबी डेटा मिळतो. डेटाची मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड १ एमबीपीएस इतका मिळतो. त्याशिवाय या प्लानमध्ये फ्री व्हॉइस कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग, झिरो लेटंसी गेमिंग, प्रीमियम कंटेट मिळणार आहेत. त्याशिवाय कंपनीकडून वेलकम ऑफर मध्ये जिओ 4K सेट टॉप बॉक्स, जिओ होम गेटवे आणि २४ इंचाचा एचडी टीव्ही देत आहे. बीएसएनएलचा २४९९ रुपयांचा प्लान बीएसएनएलच्या या प्लानचे नाव 40GB CUL Bharat Fiber आहे. यामध्ये युजर्सना १०० एमबीपीएस इंटरनेट स्पीड मिळतो. प्लानमध्ये मिळणारा डेटा हा दररोजच्या FUP मर्यादेमुळे वेगवेगळ्या पद्धतीत देण्यात आला आहे. प्लानमध्ये दररोज ४० जीबी डेटा देण्यात येतो. त्याशिवाय ४० जीबी डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड ही १०० एमबीपीएसवरून कमी होऊन ४० एमबीपीएसवर येतो. प्लानमध्ये युजर्सना हॉटस्टारची फ्री सब्सक्रिप्शन मिळते. त्याशिवाय युजर्सना कोणत्याही नेटवर्कसाठी मोफत अनलिमिटेड कॉलिंग देण्यात आली आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35Tr9vQ

Comments

clue frame