सावधान! तुमचा स्मार्ट टीव्ही करतोय तुम्हाला ट्रॅक

नवी दिल्ली: गेल्या एक-दोन वर्षांत स्मार्ट टीव्हीची क्रेझ लक्षणीय वाढली आहे. यामुळेच बाजारात एकापेक्षा जास्त वैशिष्ट्यांसह येत आहेत. जर तुम्ही देखील स्मार्ट टीव्ही देखील वापरत असाल किंवा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर स्मार्ट टीव्हीबद्दलचा अलीकडील अहवाल तुमची चिंता वाढवू शकेल. अलीकडेच, संशोधकांच्या एका टीमने दावा केला आहे की घरात लावलेले स्मार्ट टीव्ही तुमच्यावर नजर ठेवून आहेत तसेच ते तुमचा वैयक्तिक ही अॅक्सेस करत आहेत. यानंतर वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेब कंटेन्टद्वारे होतेय प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी आणि शिकागो विद्यापीठाच्या संशोधकांनी असे म्हटले आहे की स्मार्ट टीव्हीवर पाहिलेल्या वेब कंटेन्टच्या मदतीने ओटीटी अॅप वापरकर्त्यांना ट्रॅक करत आहेत. हे अ‍ॅप्स यूजर्सवर नजर तर ठेवत आहेतच शिवाय त्यांचा डेटाही चोरत आहेत. लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मसह, आणि Amazon फायर टीव्ही बद्दल असे सांगितले गेले आहे की ते वापरकर्त्यांचा मागोवा घेतात. जगातील लाखो इंटरनेट-कनेक्ट स्मार्ट टीव्ही वापरकर्त्यांसाठी हा एक मोठा धोका आहे. वेगवेगळ्या डोमेनसह शेअर होतोय डेटा ओव्हर टॉप (ओटीटी) सेवा डेटा ट्रॅकरसह येतात. रोकूच्या ९० टक्के वाहिन्या आणि अॅमेझॉन फायर टीव्हीचे ८९ टक्के चॅनल्समध्ये ट्रॅकर्स आहेत. संशोधन म्हणते की या ओटीटी सेवा ६० ट्रॅकिंग डोमेन अर्थात वेबसाइटसह वापरकर्त्यांचा डेटा शेअर करत आहेत. मायक्रोफोन इनपुट आणि व्ह्यूविंग हिस्ट्री अॅक्सेस होते ट्रॅकिंगमधून प्राप्त केलेल्या डेटाच्या आधारे कंपन्या वापरकर्त्यांना टारगेटेड जाहिराती दर्शविण्याचे काम करतात. यासाठी ते वापरकर्त्यांचे डिव्हाइस आयडी, अनुक्रमांक, वाय-फाय मेक अॅड्रेस आणि एसएसआयडीचा डेटा अॅक्सेस करतात. एवढेच नव्हे तर या सेवांविषयी असे सांगितले जाते की ते स्मार्ट टीव्हीचे मायक्रोफोन इनपुट, व्ह्यूविंग हिस्ट्री आणि वैयक्तिक माहिती देखील हॅक करतात. यूजरची लोकेशनही कळते टारगेटेड अॅडव्हर्टायझिंग व्यतिरिक्ती हा डेटा वेगवेगळ्या अॅप डेव्हलपर्ससोबत शेअर केला जातो. यामुळे डेटा लीक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. याव्यतिरिक्त, संशोधन डेटा असे म्हणतात की ओटीटी सेवेमध्ये वापरलेले स्थानिक रिमोट कंट्रोल एपीआय सुरक्षित नाही. त्याच्या मदतीने वापरकर्त्याचे स्थान, इन्स्टॉल केलेले नवीन आणि जुने चॅनेल्स आणि डिव्हाइस आयडेंटिफायर्स अॅक्सेस होतात. संशोधकांना असे कळले हे शोधण्यासाठी संशोधकांनी स्वयंचलित सिस्टमची रचना केली. यात रोकू आणि Amazon चे १,००० चॅनेल्स इन्स्टॉल केले गेले. याद्वारे, संशोधकांनी ओटीटी चॅनेल स्टोअरद्वारे चॅनेलची माहिती एकत्रित केली. संशोधकांनी डिझाइन केलेली ही व्यवस्था माणसांप्रमाणेच काम करत होती. या सिस्टीमने एक युजर बनुन सर्व चॅनेलवर जाऊन ओटीटी सेवेच्या क्षमतेचे मूल्यांकन केले. यात व्हिडिओ प्लेबॅक देखील समाविष्ट होता. या प्रक्रियेमधून गोळा केलेल्या डेटाचा अभ्यास केल्यानंतर, संशोधकांची खात्री झाीली की ओटीटी सेवा वापरकर्त्याचा डेटा अॅक्सेस करते.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32gSF4e

Comments

clue frame