जिओच्या नावाने बनावट मेसेजद्वारे फसवणूक

मुंबई: रिलायन्स जिओकडून फ्री डेटा मिळत असल्याचा मेसेज जर तुम्हाला आला असेल, तर सावध व्हा. हा मेसेज बनावट असू शकतो. या बनावट मेसेजमुळे तुमची फसवणूक होऊ शकते. कंपनीनेच अशा बनावट मेसेजपासून सावध राहण्याचं आवाहन आपल्या ग्राहकांना केलं आहे. अशाच एका मेसेज मध्ये रिलायन्स जिओकडून २५ जीबी डेटा फ्री दिला जाईल असा दावा करण्यात आला आहे. यूजर्सना जेव्हा जिओने माहिती दिली तेव्हा या बनावट मेसेजवर शिक्कामोर्तब झालं. याव्यतिरिक्त लॉटरीशी संबंधित मेसेजही लोकांना येत आहेत. एका यूजरला एक मेसेज आला. त्यात लिहिलं होतं की, 'गुड न्यूज! जिओ ६ महिन्यांपर्यंत दररोज २५ जीबी फ्री डेटा देत आहे. अॅप डाउनलोड करा आणि ऑफर अॅक्टिव्हेट करण्यासाठी रजिस्टर करा.' जेव्हा यूजरने रिलायन्स जिओला याबाबत कळवले तेव्हा कंपनीने स्पष्ट केलं की हा एक बनावट मेसेज आहे आणि जिओचं नाव वापरून ग्राहकांची फसवणूक करण्याचा हा प्रकार असू शकतो. रिलायन्स जिओने म्हटलंय की जिओ असे मेसेज पाठवत नाही. जिओ ऑफरशी संबंधित सर्व माहिती MyJio app किंवा Jio.com वर उपलब्ध आहे. हा स्पॅम मेसेज फसवणुकीसाठी असू शकतो.' केबीसी-जिओ लॉटरीचा फेक मेसेज फसवणूक करणारे पॉप्युलर टीव्ही शो कौन बनेगा करोडपती आणि जिओचं नाव एकत्रित घेत आहेत. आपल्याला असे व्हॉट्स अॅप कॉल किंवा मेसेज आले पण त्यात दावा केलो होता की केबीसी आणि जिओद्वारे आयाोजित लॉटरी तुम्ही जिंकली आहे. एका जिओ ग्राहकाला व्हॉट्स अप वर मेसेज आला की त्याने २५ लाख रुपयांची लॉटली जिंकली आहे. मेसेजमध्ये असं लिहिलेलं की ही लॉटरी केबीसी आणि जिओने मिळू आयोजित केली आहे. जेव्हा ग्राहकाने काउंटरला फोन केला तेव्हा फोन डिस्कनेक्ट झाला. जिओसोबत एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि पेटीएमचीही नावं िरलायन्स जिओच्या अन्य एका ग्राहकाने व्हॉट्स अप मेसेजचा स्क्रीनशॉट ट्विट केला आहे. यात केवळ जिओच नव्हे तर एअरटेल, वोडाफोन-आयडिया आणि पेटीएमचेही लोगो आहेत. यात एक बनावट लॉटरी क्रमांकही दिला गेला आहे आणि म्हटलंय की कस्टमरने २५ लाख रुपये जिंकले आहेत. जिओचा अलर्ट रिलायन्स जिओने सांगितलं आहे की अशा कुठल्याही कॉल किंवा मेसेजकडे दुर्लक्ष करा आणि याची तक्रार करा. जिओ असा कुठलाही मेसेज वा कॉल करत नाही. जिओसंबंधित सर्व माहिती MyJioapp किंवा Jio.com वर उपलब्ध आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33bNGBP

Comments

clue frame