जिओची स्वस्ताई संपली; 'हा' आहे कमी किंमतीतला प्लान

नवी दिल्ली: जिओने लाँचिंग वेळेस स्वस्तात मस्त अशा प्लानची भूरळ पाडून ग्राहकांना आपल्याकडे आकृष्ट केले होते. त्याशिवाय टेलिकॉम सेक्टरमध्येही तीव्र स्पर्धा निर्माण केली. आता मात्र, जिओने आपले स्वस्तातील काही प्लान बंद केले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जिओने नुकताच आपला १९ रुपये आणि ५२ रुपयांचा प्रीपेड पॅक बंद केला आहे. प्रति ग्राहक सरासरी उत्पन्नावर परिणाम होऊ नये यासाठी जिओने आपले दोन्ही प्लान बंद केल्याची माहिती जाणकार देतात. बंद करण्यात आलेल्या १९ रुपयांच्या प्लानमध्ये एक दिवसाची आणि ५२ रुपयांच्या प्लानमध्ये सात दिवसांची वैधता मिळत होती. इंटरकनेक्ट युजर्स चार्जेसच्या (आययूसी) घोषणेनंतर जिओच्या प्लानमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. सध्या आययूसी म्हणून जिओ आपल्या ग्राहकांकडून ६ पैसे प्रति मिनिट दर आकारते. जिओचा सर्वात स्वस्त प्लान ९८ रुपयांचा जिओने आपले १९ रुपये आणि ५२ रुपयांचा प्लान बंद केल्यानंतर सर्वात स्वस्तातील रिचार्ज ९८ रुपयांचा झाला आहे. या ९८ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळणार आहे. दररोज २ जीबी डेटा प्लानमध्ये उपलब्ध आहे. त्याशिवाय या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची ऑफर आहे. दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ग्राहकांना आययूसी टॉपअप करावा लागणार आहे. एअरटेल, व्होडाफोनकडे स्वस्त दरातले प्लान जिओशी स्पर्धा करणाऱ्या एअरटेल, व्होडाफोनकडे स्वस्तातील प्लान आहेत. एअरटेल ग्राहकांना ३५ रुपयांचा प्लान देत आहे. यामध्ये २८ दिवसांची वैधता आहे. त्याशिवाय २३ रुपयांचा आणखी एक प्लान आहे. ज्यामध्ये २८ दिवसांची वैधता आहे. मात्र, त्यात आउटगोइंग कॉलचा फायदा ग्राहकांना मिळणार नाही. त्याशिवाय व्होडाफोनकडेदेखील ३५ रुपयांचा प्लान आहे. त्यामध्ये २८ दिवसांची वैधता व्हॉइस कॉलिंग आणि डेटाचा फायदा ग्राहकांना मिळणार आहे. त्याशिवाय व्होडाफोन ग्राहकांना २४ रुपयांचा प्लान ऑफर करत आहे. त्यामध्ये फक्त वैधता असून इतर कोणताही फायदा देण्यात आला नाही. टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धांमुळे आपल्याकडील ग्राहक संख्या टिकून रहावी आणि वाढावी यासाठी कंपन्यांनी कमी दरातील प्लान लाँच केले होते.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MZMivD

Comments

clue frame