मुंबई : आपल्या सुरक्षित असावा. इतर कोणाच्या हातात फोन गेल्यास त्यातला डेटा इतरांनी पाहू नये यासाठी आपण फोन लॉक ठेवतो. त्यासाठी पासवर्ड, पिन किंवा पॅर्टन लॉकचा आपण वापर करतो. परंतू यापेक्षाही सुरक्षित म्हणून आपण फिंगर लॉक किंवा फेस लॉकचा वापर करतो. परंतू सॅमसंगच्या एस१० मध्ये एक अपडेट करण्यात आलं आहे. यामध्ये बग आल्यानं , सिरीजचे फिंगरप्रिंट लॉक इतर कोणालाही उघडता येत होतं. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये एका विशिष्ट बगमुळं इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला अडचण येत आहे. त्यामुळं कोणालाही कोणाच्याही मोबाइलचं फिंगरप्रिंट लॉक सहजपणे उघडता येत होतं. ग्राहकांनी तक्रारी केल्यानंतर सॅमसंगनं दखल घेतली असून हा बग दूर करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. गॅलेक्सी एस-१०, एस-१० प्लस आणि गॅलेक्सी नोट -१० या फोन्सच्या फिंगरप्रिंट लॉकमध्ये बग असल्याचं लक्षात आल्यानंतर सॅमसंगने ग्राहकांना 'जोपर्यंत कंपनीकडून अपडेट दिलं जात नाही तोपर्यंत सीलिकॉन कव्हरचा वापर करा' असं सांगण्यात आलं होतं. कंपनीकडून लवकरच अपडेट्स देण्यात येतील. फिंगरप्रिंट सेन्सरमध्ये असलेल्या बगला काढून टाकण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागू शकतो. पुढच्या आठवड्यात अपडेट जारी करण्यात येईल, असंही सांगण्यात आलं आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2oPVSt4
Comments
Post a Comment