सेक्स व्हिडिओ लीक करण्याची धमकी, ई-मेलद्वारे खंडणीची मागणी

नवी दिल्ली: पॉर्न व्हिडिओ पाहणे किंवा वेबकॅमवर शूट करणं तुम्हाला गोत्यात आणू शकतं. जगभरातील लाखो यूजर्सना त्यांचे सेक्स व्हिडिओ लीक करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. हा सगळा प्रकार इंटरनेट आणि ई-मेलच्या माध्यमातून होत आहे, अशी धक्कादायक माहिती आहे. ग्लोबल सायबर सेक्युरिटी फर्म चेकपॉइंटच्या एका वृत्तानुसार, Phorpiex नावाच्या एका बॉटनेटचा ठावठिकाणा लागला आहे. त्याद्वारे यूजर्सना प्रत्येक तासाला ३० हजार ई-मेल पाठवले जातात. या ई-मेलच्या माध्यमातून सेक्स व्हिडिओ लीक करण्याची धमकी देऊन यूजर्सकडे खंडणीची मागणी केली जात आहे. गेल्या पाच महिन्यांत Phorpiex च्या खात्यांमध्ये १ लाख १० हजार डॉलर ट्रान्सफर झाले आहेत. यूजर्सच्या पासवर्डची माहिती Phorpiex ला खूपच धोकादायक मानलं जातं. त्यांना यूजर्सचे पासवर्डही माहिती आहेत. ब्लॅकमेल करून खंडणीची मागणी करणाऱ्या ई-मेलच्या सुरुवातीलाच यूजर्सना त्यांचे पासवर्ड माहीत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं यूजर्सच्या मनातही भीती निर्माण होते. यूजर्सच्या मनात भीती चुकीच्या मार्गानं पैसे कमावण्याचा हा नवा प्रकार समोर आला आहे. यामध्ये कुणालाही फोन करण्याची गरज नाही आणि कुणाकडे जाऊन पैसे मागण्याची आवश्यकताही नाही. हा संपूर्ण प्रकार इंटरनेट आणि ईमेलच्या माध्यमातून होत आहे. सायबर गुन्हेगार यूजर्सना ई-मेल पाठवून सेक्स कॉन्टेंट लीक करण्याची धमकी देतात आणि खंडणीची मागणी करतात. व्हिडिओ लीक होऊ नये या भीतीने यूजर्सही त्यांच्या खात्यात पैसे जमा करतात. गेल्या दहा वर्षांपासून सक्रिय हा बॉटनेट गेल्या दहा वर्षांपासून सक्रिय आहे, असं सांगितलं जात आहे. Phorpiex वेगवेगळ्या मालवेअरच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सी कमावत होता. हा एक धोकादायक बॉट असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. अगदी सहज ते कमांड आणि कंट्रोल सर्व्हरवरून ई-मेल अॅड्रेस डेटाबेस मिळवतात. त्यानंतर त्यातील एका ई-मेलची निवड करून त्याला अशा प्रकारचे मेल पाठवले जातात. हे स्पॅम बॉट तासाला ३० हजार ई-मेल पाठवतं. एका स्पॅमद्वारे एकाच वेळी दोन कोटी सत्तर लाखांहून अधिक यूजर्सना आपल्या जाळ्यात ओढलं जाऊ शकतं. गेल्या काही वर्षांत डेटा लीकमुळं हॅकर्सना यूजर्सच्या पासवर्डची माहिती मिळाली आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2nRD5wK

Comments

clue frame