स्मार्टफोन गॅलेक्सी फोल्डची प्री-बुकिंग ११ ऑक्टोबरला

नवी दिल्ली: सॅमसंगच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी फोल्डची प्री-बुकिंग ११ ऑक्टोबरला करता येणार आहे. यापूर्वी, कंपनीने ४ ऑक्टोबर रोजी हा फोन प्री-बुकिंगसाठी उपलब्ध केला होता. मात्र तेव्हा अवघ्या अर्ध्या तासात हा फोन आउट ऑफ ऑफ स्टॉक झाला. ४ ऑक्टोबर रोजी कंपनीने १,६०० गॅलेक्सी फोल्ड युनिटची विक्री केली. प्री बुकिंगसाठी ग्राहकांना फोनची पूर्ण किंमत १,६४,९९९ रुपये आगाऊ द्यावयाची आहे. सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरमध्ये दुपारी १२ वाजल्यापासून प्री-बुकिंग सुरू होईल. हा फायदा या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना अनेक फायदे मिळणार आहेत. प्रीमियम होम डिलिव्हरी, एक वर्षासाठी अपघात हानी संरक्षण मिळणार आहे. फोनसोबत बॉक्समध्ये गॅलेक्सी बड्स, Arambid केससह काही अॅक्सेसरीज आणि बुकलेट्स असतील. फोनची डिलिव्हरी २० ऑक्टोबरपासून सुरू होईल. गॅलेक्सी फोल्डची वैशिष्ट्ये फोनचा फ्रंट डिस्प्ले ४.६ इंचाचा आहे. यात 840x1960 पिक्सल रिझोल्यूशन आणि सुपर AMOLED डिस्प्ले आहे. त्याचा आस्पेक्ट रेशियो २१:९ आहे. फोनमध्ये असलेल्या दुसऱ्या डिस्प्लेबद्दल बोलायचं तर तो डिस्प्ले ७.३ इंचाचा आहे. हा डिस्प्ले इनफिनिटी फ्लेक्स डायनॅमिक AMOLED पॅनल वाला आहे. ४.२:३ आस्पेक्ट येणारं डिस्प्ले पॅनलचं रिझोल्यूशन QXGA म्हणजेच 1526x2152 पिक्सल आहे. फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमरा सेटअप दिला आहे. यात १६ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि १२ मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आहे. फोनचा तीसरा कॅमरा १२ मेगापिक्सलचा आहे जो टर्शिअरी सेंसरसोबत येतो. फोनच्या फ्रंटला १० मेगापिक्सल + ८ मेगापिक्सचा ड्युअल कॅमरा सेटअप आहे. इतकेच नव्हे तर फोनच्या कव्हरवरदेखील १० मेगापिक्सलचा एक कॅमेरा सेंसर आहे. १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबीच्या इंटरनल स्टोरेजसह येणारा हा फोन माइक्रो एसडी कार्ड सपोर्ट करत नाही. प्रोसेसरबद्दल सांगायचं तर फोनमध्ये ऑक्टा-कोर एसओसी प्रोसेसर दिलं आहे. ऑपरेटिंग सिस्टम बद्दल सांगायचं तर हा फोन अँड्रॉइड ९ वर आधारित सॅमसंगच्या One UI वर काम करतो. फोनमध्ये 4,380mAh ची बॅटरी आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/338OeIs

Comments

clue frame