नवी दिल्लीः रिलायन्स जिओने अलिकडेच ग्राहकांच्या आउटगोइंग कॉल्सवर शुल्क लावण्यास सुरुवात केलीय. जिओ व्यतिरिक्त इतर कुठल्याही नेटवर्कवर कॉल केल्यास ६ पैसे प्रतिमिनिट इंटरकनेक्ट युजेस शुल्क (IUC) लागू करण्यात आलंय. दुसऱ्या नेटवर्क्सवर करण्यात येणाऱ्या कॉल्ससाठी कंपनीला पैसे मोजावे लागतात. यालाच IUC शुल्क म्हणतात. हा नवीन नियम १० ऑक्टोबरपासून प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना लागू करण्यात आला आहे. पण १० ऑक्टोबरपूर्वी केलेल्या रिचार्जची वैधता संपल्यावरच ग्राहकांना नवे शुल्क लागू होईल, असं कंपनीने स्पष्ट केलंय. IUC शुल्कासाठी जिओचे व्हाउचर्स जिओने आपल्या वर्तमान प्रीपेड आणि पोस्टपेड प्लानमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. कंपनीने IUC शुल्क वेगळे व्हाउचर्स सुरू केलेत. १० रुपये ते १०० रुपयांपर्यंत व्हाउचर्स घेऊ शकता. जिओने प्रत्येक १० रुपयांच्या व्हाउचरसोबत १ जीबी अतिरिक्त डेटा देण्याची घोषणा केलीय. यानुसार १०० रुपयांच्या हाउचरवर १० जीबी अतिरिक्त डेटा ग्राहकांना मिळणार आहे. असे असेल जिओ ग्राहकांसाठी IUC शुल्क आउटगोइंग कॉल्सवरील शुल्कामुळे ग्राहक नाराज होतील, अशी जिओला भीती आहे. यामुळे कंपनीने एक व्हिडिओ जारी करत ग्राहकांना समजवण्याचा प्रयत्न केलाय. IUC शुल्क हे इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी आहेत, असं जिओने या व्हिडिओत म्हटलंय. आर्ध्या तासाच्या कॉलसाठी जिओच्या ग्राहकांना १.८० रुपये IUC शुल्क द्यावे लागते. तर इतर कंपन्या इतक्याच कालावधीसाठी ४५ रुपये घेतात, असं जिओने स्पष्ट केलंय. IUC शुल्क म्हणजे नेमंक काय? आउटगोइंक कॉल करणारा ऑपरेटर हा कॉल रिसिव्ह करणाऱ्या ऑपरेटरला शुल्क देतो. यालाच इंटरकनेक्ट युजेस शुल्क म्हणजे IUC असं म्हणतात. ट्रायने ६ पैसे प्रतिमिनिट इतके IUC शुल्क निश्चित केले आहे. उदा. जिओचा एखादा ग्राहक व्होडाफोन नंबरवर कॉल करत असेल तर जिओला ६ पैसे प्रतिमिनिट दराने व्हाोडाफोनला पैसे द्यावे लागतील.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33Bo8ht
Comments
Post a Comment