फ्री टॉकटाइमः 'जिओ'च्या ग्राहकांसाठी खूशखबर!

नवी दिल्लीः रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी () कंपनीने फ्री टॉकटाइम देण्याचा निर्णय घेतला आहे. या टॉकटाइमची मर्यादा फक्त ३० मिनिटे इतकी असणार आहे. ऐन सणासुदीत आपल्या ग्राहकांना आनंद मिळावा यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल करण्यासाठी पैसे मोजावे लागण्याचा निर्णय जिओने दोन दिवसांपूर्वीच घेतला होता. जिओच्या ग्राहकांनी अन्य दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या नेटवर्कवर व्हाईस कॉल केल्यास ग्राहकांना प्रति मिनिट ६ पैसे मोजावे लागणार आहे. यातून ग्राहकांना थोडा दिलासा मिळावा यासाठी कंपनीने आता हा निर्णय घेतला आहे. जिओची लिमिटेड मर्यादा ऑफर ही ४८ तासांपेक्षा कमी आहे. पॅक रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांना कंपनीने मेसेज पाठवायला सुरुवात केली आहे. जिओच्या ग्राहकांसाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा आपला फोन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना ३० मिनिटांचा फ्री टॉकटाइम मिळणार आहे. या वन-टाइम ऑफर प्लानच्या घोषणेनंतर पहिल्या ७ दिवसांसाठी ही ऑफर उपलब्ध असणार आहे. जिओने आऊटगोईंग साठी चार्ज लावल्यानंतर आणि याची तत्काळ अंलबजावणी ९ ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. जिओच्या अंमलबजावणीनंतर जिओच्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एअरटेल आणि व्होडाफोन कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत. जिओच्या या निर्णयानंतर ट्विटर व सोशल मीडियावर सुद्धा जिओच्या ग्राहकांनी जोरदार टीका केली आहे. अनेक ग्राहकांनी रिलायन्स जिओला तीन वर्षापूर्वी आपली सेवा सुरू करताना त्यांनी जे ग्राहकांना फ्री लाईफटाइम व्हाईस कॉलचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले आहे?, असे म्हणत त्यांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून दिली. जिओच्या आउटगोईंग कॉलवर चार्ज लावण्याच्या निर्णयानंतर अनेक ग्राहकांनी नंबर पोर्ट करण्याची धमकी सुद्धा दिली आहे. ९ ऑक्टोबरला रिलायन्स जिओच्या घोषणेनंतर ट्विटरवर #boycott-Jio हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला होता. त्यानंतर #ilovejio हा हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला होता. तसेच मीम वॉरही पाहायला मिळाले होते. काही ग्राहकांनी जिओच्या प्लानवर टीका केली होती. दुसऱ्या नेटवर्क्सवर कॉल केल्यास ग्राहकांना १०, २०, ५० आणि १०० रुपयांचा व्हाऊचर खरेदी करावे लागणार आहे. देशभरात जिओचे ३५ कोटीहून अधिक ग्राहक आहेत.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VBBW99

Comments

clue frame