नवी दिल्लीः सॅमसंगने भारतात आपला ए सीरिजचा नवा स्मार्टफोन () भारतात लाँच केला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन बजेटच्या फोनपैकी एक आहे. ( Galaxy A20s) या फोनला मागील महिन्यात मलेशियात लाँच करण्यात आले होते. गॅलेक्सीने ए२०एस याच वर्षात लाँच केले होते. गॅलेक्सी ए२०चे अपग्रेडेड व्हर्जन म्हणजेच हा नवीन फोन आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे यात तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहे. गॅलेक्सी ए२० एस मध्ये अँड्रॉयड पाय ९.० वर आधारित वन यूआय मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळणार आहे. या फोनचे रिझॉल्यूशन ७२०X१५१६ पिक्सलचा आहे. डिस्प्लेसोबत व्ही टाइप नॉच मिळणार आहे. यात क्वालक्वॉमचे स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर आणि ४ जीबी पर्यंत रॅम आहे. यात तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहे. यातील एक कॅमेरा १३ मेगापिक्सलचा एफ/१.८ अपर्रचरचा, दुसरा लेन्स ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइल्ड अँगल आणि तिसरा लेन्स ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. गॅलेक्सी ए२० एस मध्ये 4G VoLTE, वाय-फाय ब्लूटूथ v4.2, जीपीएस, यूएसबी टाइप सी टार्जिंग आणि ३.५ एमएमचा हेडफोन जॅक देण्यात आला आहे. फोनमध्ये मागे फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी १५ डब्ल्यूची फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी आहे. Samsung Galaxy A20s च्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजची किंमत १३ हजार ९९९ रुपये इतकी आहे. गॅलेक्सी ए२० एस ब्लॅक, ब्लू, आणि ग्रीन या तीन रंगात उपलब्ध आहे. या फोनची विक्री आज म्हणजेच ५ ऑक्टोबरपासून सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोर, ओपेरा हाउस, तसेच ऑनलाइन स्टोअर व ऑफलाइन स्टोरवर सुरू होणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30U8gVW
Comments
Post a Comment