पुणे : पृथ्वीपासून 340 प्रकाशवर्षे दूर असलेल्या 'एचडी 86081'या ताऱ्याला आणि 'एचडी 86081 बी'या ग्रहाला भारतीय नाव देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघ (आयएयु) आणि भारतीय ज्योतिर्विज्ञान संस्था यांनी प्रत्येकी पाच नावे अंतिम फेरीसाठी निश्चित केली आहे. संस्कृत आणि बंगालीत असलेल्या या नावांपैकी ज्या नावाला सगळ्यात जास्त पसंती असेल, असे नाव त्या ग्रहाला आणि ताऱ्याला देण्यात येणार आहे. नावाला पसंती देण्याची मुदत गुरुवार (ता.31) पर्यंत आहे.
आपल्याच आकाशगंगेत ही एक तारा आणि एक ग्रह असलेली ही सूर्यमाला सापडली आहे. त्यातील सुर्यासाठी म्हणजेच "एचडी 86081'या ताऱ्यासाठी अनाहत (नेहमी उपस्थित), बीभा (प्रकाशकिरण, डॉ.बीभा चौधरी यांची स्मृतीप्रित्यर्थ), रश्मीरथी(सूर्याचा रथाचा सारथी), सुतेज(तेजस्वी) आणि विभास(चमकणारा) ही पाच नावे अंतिम पसंतीसाठी निश्चित करण्यात आली आहे. तसेच ग्रहाला अर्थात टएचडी 86081 बी'या ग्रहाला अभ्रकासिन(ढगांमध्ये लपनारा), आलेया, संतमस (ढगांनी व्यापलेला), तप्तबृहस (उष्ण गुरूग्रह) आणि तुरंग (दैवी घोडा) या नावांचे नामांकन करण्यात आले आहे.
जगातील कोणतीही व्यक्ती या पैकी प्रत्येकी एका नावाला मतदान करू शकते. मतदान करण्यासाठी नागरिकांनी https://astron-soc.in/outreach/activities/name-exoworlds/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

from News Story Feeds https://ift.tt/31QEv8A
Comments
Post a Comment