Xiaomi चा दिवाळी सेल; स्मार्टफोन्सवर १२ हजारांपर्यंत सूट

मुंबई: फेस्टिव्ह सीझन येताच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सेल सुरू होतात. सेलमध्ये तुम्ही तुमच्या पसंतीच्या वस्तू आकर्षक डील आणि ऑफरमध्ये खरेदी करू शकतात. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचा फेस्टिव्ह सेल आजपासून सुरू झाला आहे तर चीनची आघाडीची दिग्गज इलेक्ट्रॉनिक कंपनी India ने देखील आपला दिवाळी सेल सुरू केला आहे. शाओमीचा सेल ४ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, फिटनेस बँड, स्पीकर्स, स्मार्टफोन्स यासह अन्य उत्पादनांवर भरघोस डिस्काउंट मिळणार आहे. कोणत्या स्मार्टफोनवर किती सवलत रेडमी 7A रेडमी 7A ची किंमत एरव्ही ५,९९९ आहे. पण शाओमीच्या दिवाळी सेलमध्ये यावर ५०० रुपयांची सवलत मिळत आहे. रेडमी नोट 7S अलीकडेच लाँच झालेला रेडमी नोट 7S १०,९९९ रुपयांना आहे. मात्र या दिवाळी सेलमध्ये याची किंमत ८,९९९ रुपये आहे. रेडमी Y3 हा बजेट फोन स्मार्टफोन्स युजर्सच्या पसंतीस उतरत आहे. कंपनीने हा फोन ९,९९९ रुपयांमध्ये लाँच केला, पण दिवाळी सेलमध्ये तो ७,९९९ रुपये आहे. पोको F1 शाओमीने पोको F1 कंपनीच्या स्मार्टफोन्सला फ्लॅगशीप डिव्हाइस म्हणून लाँच केले होते. याची १८,९९९ रुपये किंमत होती. सेलमध्ये ती १५,९९९ रुपये आहे. रेडमी K20 रेडमी K20 २१,९९९ रुपयांऐवजी सेलमध्ये १९,९९९ रुपयांना मिळत आहे. तर रेडमी K20 Pro २७,९९९ ऐवजी २४,९९९ रुपयांना मिळत आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2mQ2I0z

Comments

clue frame