मुंबई: चायनीज स्मार्टफोन बनवणारी कंपनी विवोने आपल्या U सिरीजचा पहिला स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. बजेटमध्ये असणाऱ्या या फोनचे फिचर्सही आकर्षक आहेत. या फोनमध्ये रिअर पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेट अप आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर आहे. यूजर्सना खास गेमिंग मोडही मिळणार आहे. U10 ची सुरुवातीची किंमत ८,९९० रुपये आहे. ही किंमत 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेल्या मोबाइलची आहे. 3GB रॅम आणि 64GB स्टोरेजच्या Vivo U10 ची किंमत ९,९९० रुपये आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या Vivo U10 ची किंमत १०,९९० रुपये आहे. हा स्मार्टफोन एक्सक्लुझिव्हली अॅमेझॉनवर असणार आहे. याची विक्री अॅमेझॉनच्या २९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलदरम्यान होणार आहे. हा फोन इलेक्ट्रिक ब्ल्यू आणि थंडर ब्लॅक अशा दोन रंगात उपलब्ध असेल. याला ६.३५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये रिअर पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेट अप आहे. १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर या फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये असेल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2mNddRX
Comments
Post a Comment