नवी दिल्ली: चीनची टेक कंपनी वनप्लसने भारतात आपला TV लाँच केला आहे. सॅमसंग आणि सोनी टीव्हीसारख्या प्रिमीयम स्मार्ट टीव्ही कंपन्यांना टक्कर देण्यासाठी हा टीव्ही कंपनीने बाजारात आणला आहे. वनप्लसने दिल्ली येथे आयोजित एका लाँच इव्हेंटमध्ये हा टीव्ही लाँच केला. OnePlus TV मेटल बिल्ड आणि उत्कृष्ट ऑडियो-व्हिडिओ हार्डवेअरसह लाँच केला गेला आहे. ५५ इंचाचा 4K QLED डिस्प्लेव्यतिरिक्त या स्मार्ट टीव्हीमध्ये पॉवरफुल साऊंड क्वालिटीसाठी डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे. OnePlus TV ची किंमत वनप्लसने टीव्हीचे दोन मॉडेल लाँच केले आहेत. पहिल्या OnePlus TV Q1 ची किंमत ६९,००० रुपये आहे. दुसरे मॉडेल OnePlus TV Q1 Proची किंमत ९९,९०० रुपये आहे. वनप्लसने हा टीव्ही सर्वात आधी भारतात लाँच केला आहे. अन्य देशात तो नंतर लाँच होणार आहे. या टीव्हीची विक्री २८ सप्टेंबरपासून अॅमेझॉनवर सुरू होणार आहे. OnePlus TV ची वैशिष्ट्ये ५५ इंचाचा 4K QLED डिस्प्ले क्वॉन्टम डॉट डिस्प्ले टेक्नॉलॉजी MT5670 क्वॉड-कोर प्रोसेसर रिझोल्युशन 1920x1080 पिक्सेल तीन वर्षांपर्यंत अँड्रॉइड टीव्ही सॉफ्टवेयर अपडेट्स ५० वॅट्स चे ८ स्पीकर रिमोटमध्ये डेडिकेटेड Prime Video बटण
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2meeMIH
Comments
Post a Comment