बहुचर्चित Nokia 7.2 लाँच, जाणून घ्या किंमत

नवी दिल्लीः एचएमडी ग्लोबलने भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी या फोनला सोशल मीडियावर टीज करणं सुरू केलं होतं. तसेच या फोनला नुकतेच आयएफए २०१९ मध्ये पहिल्यांदा समोर आणले होते. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा असून या फोनची किंमत १८ हजार ५९९ रुपये इतकी आहे. या फोनमध्ये डिस्प्ले पॅनल देण्यात आला असून ऑलवेज ऑन एचडीआर टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. या फोनची किंमत १८ हजार ५९९ रुपये इतकी असली तरी ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजची किंमत १९ हजार ५९९ रुपये इतकी आहे. हा फोन चारकोल आणि स्यान ग्रीन कलरमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनची विक्री २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. एचडीएफसी कार्डवरून हा फोन खरेदी केल्यास १० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. ही कॅशबॅक ऑफर ३१ ऑक्टोबरपर्यंत वैध आहे. या फोनवर शून्य डाउन पेमेंट, शून्य प्रोसेसिंग फी, नो इंट्रेस्ट कॉस्टवर या फोनची ऑफर आहे. या ऑफरचा वापर करण्यासाठी बजाज फायनान्स, आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी बँक सीडी लोन, एचडीबीएफएसवरून पेमेंट करावी लागणार आहे. ची वैशिष्ट्ये >> ६.३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले >> क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६० एसओसी >> ४ जीबी आणि ६ जीबी रॅम दोन पर्याय >> ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा >> ट्रिपल रियर कॅमेराचा सेटअप >> सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा >> 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac >> ब्लूटथ v5.0, GPS/ A-GPS,


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32Sjc7O

Comments

clue frame