सॅमसंग M30s आज होणार लाँच

नवी दिल्लीः एम३०एस आज भारतात लाँच होणार आहे. याच वर्षी भारतात लाँच झालेल्या एम सिरीजचा गॅलक्सी ए३०चा अपडेटेड वर्जन आहे. फोन लाँच होण्याआधी कंपनीनं या फोनच्या फिचरबाबत माहिती जाहीर केली होती. गॅलक्सी एम३०एसचं खास वैशिष्ट्य म्हणजे ६,०००एमएच क्षमतेची बॅटरी तसंच, कंपनीनं स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसोबत सुपर अमॉल्ड डिस्प्ले आणि एक्सनॉस ९६११ एसओसी प्रोसेसर दिला आहे. इथं होणार लाइव्ह स्ट्रिमिंग सॅमसंग गॅलक्सी एम३०एस आज दुपारी बारा वाजता लाँच होणार आहे. या फोनचा लाँचिग सोहळा सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. त्याचबरोबर अॅमझॉनवरही युजर हा सोहळा पाहू शकणार आहेत. किंमत कंपनी हा फोन ४ जीबी+६४ जीबी आणि ६जीबी+१२८ जीबी या दोन वेरियंटमध्ये लाँच करणार आहे. सूत्रांनुसार कंपनी या फोनची किंमत १५,००० ते २०,००० रुपयांपर्यंत ठेवणार असून युजर्स अॅमझॉनवर फोन खरेदी करु शकतात.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2M1kw15

Comments

clue frame