चांद्रयान LIVE: चंद्रस्पर्शाच्या 'विक्रमा'चे काऊंटडाऊन सुरू

बेंगळुरू: विज्ञानक्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरीपासून भारत अवघे काही तास दूर आहे. आज रात्री दीड वाजता भारताचं चांद्रयान चंद्रावर उतरणार असून त्याचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. त्यामुळे या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व क्षणाची वाट पाहण्यासाठी देशासह जगभरातील कानाकोपऱ्यात असलेले भारतीय अतूर झाले आहेत. या चंद्रयान मोहिमेशी संबंधित माहिती जाणून घ्या... अपडेट्स... >> चंद्राच्या ज्या कक्षेत आजवर कोणी गेलं नाही, त्या ठिकाणी आपलं चांद्रयान जाणार आहे. आमचा सॉफ्ट लँडिंगवर पूर्ण विश्वास असून आज रात्रीची आम्ही वाट पाहत आहोत: इस्त्रोचे चेअरमन सिवन >> >> मिशननुसारच विक्रम लँडर पुढे सरकत असल्याचं इस्त्रोच्या प्रमुखांनी सांगितलं. >> चांद्रयान मोहिमेकडे १३० कोटी भारतीयांचं लक्ष लागलं आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी >> हे मिशन यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरेल >> लँडिंगनंतर पहाटे ५ ते ६ वाजेच्या दरम्यान हे रोव्हर रोल आऊट करेल >> इस्रोच्या माहितीनुसार शनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या सुमारास चांद्रयान-२ विक्रम लॅडर चंद्राला स्पर्श करेल. >> चांद्रयान-२ चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या मोहिमेकडे लागलं आहे.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZRb0CL

Comments

clue frame