नवी दिल्ली: जगभरात सर्व स्मार्टफोन कंपन्या आपले फोल्डेबल स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहेत. येत्या काही वर्षांत फोल्ड करता येणाऱ्या स्मार्टफोनची क्रेझ वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे हुवावे, सॅमसंग कंपन्यांनी फोल्डेबल स्मार्टफोन आणण्याची घोषणा केलीय तर एलजीने एकदम अनोख्या डिझाइनचा फोल्डेबल फोन आणण्याची तयारी सुरू केली आहे. दक्षिण कोरियाची कंपनी असलेल्या एलजीने एक घडी करता येणाऱ्या स्मार्टफोनच्या डिझाइनचं पेटंट बनवलं आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये एलजीने हे पेटंट फाइल केलं आहे. यावर्षी जूनमध्ये ते प्रकाशित झालं आहे. फोनमध्ये विशेष रोलेबर डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन दुमडत गेल्यावर लहान होतो आणि उघडल्यावर त्याचा डिस्प्ले स्मार्टफोनच्या आकाराचा होतो. एलजीने अलीकडेच फोनचं एक रेंडर रिलीज केलं आहे. यात ही डिझाइन दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या फोनला चार वेळा दुमडता येऊ शकणार आहे. पूर्ण उघडल्यावर तो टॅलबेटपेक्षा मोठा होईल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34Cp2vJ
Comments
Post a Comment