सावध व्हा; IT च्या नावाने येऊ शकतात फेक मेल्स

नवी दिल्ली: भारत सरकारची सायबरसिक्युरिटी CERT-In ने सर्व नागरिकांना एका अत्यंत धोकादायक अशा ऑनलाइन मोहिमेसंदर्भात सावध केले आहे. आयकर विभागाकडून पाठवण्यात येणाऱ्या मेल्सप्रमाणे दिसणारे फेक ईमेल लोकांना पाठवण्यात येत आहेत. आयकर विभागाकडून येणारा मेल म्हटल्यावर लोक गांभीर्याने त्याची दखल घेतात. याच गोष्टीचा हॅकर्स फायदा उठवतात. आयकर विभागाचे वाटावेत अशा या फेक मेलसोबत लोकांच्या सिस्टीमपर्यंत मेलवेअर पोहोचतात. CERT नुसार, लोकांना फसवण्यासाठी अशा मेल्सच्या सबजेक्ट लाइनमध्ये इनकम टॅक्सचा उल्लेख असतो. ‘Important: Income Tax Outstanding Statements A.Y 2017-2018’ किंवा ‘Income Tax statement’ असं या मेलच्या सबजेक्टमध्ये लिहिलेलं असतं. १२ सप्टेंबरच्या आसपास असे बनावट मेल अनेक लोकांना पाठवण्यात आले. आयकर विभागाने असा कुठलाही मेल पाठवला नव्हता. असा मेलचं उद्दिष्ट लोकांची वैयक्तिक माहिती चोरणं हेच असतं. अशा मेलच्या अटॅचमेंटमध्ये दिलेली मॅलिशय.pif फाइल एक कमांड फॉलो करते आणि विंडोज रजिस्ट्रीमध्ये बदल करण्यासाठी सर्व्हरचं नियंत्रण करते. यानंतर युजरची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करते.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2l1DYBF

Comments

clue frame