उद्या सुरू होणार iphone 11 सीरिजची प्री-बुकिंग

मुंबई: अलीकडेच लाँच झालेल्या ची भारतातली प्री-बुकिंग उद्यापासून सुरू होणार आहे. अॅपलने १० सप्टेंबर रोजी आयफोनची नवी रेंज लाँच केली होती. यावेळी 11, आणि हे फोन लाँच करण्यात आले होते. भारतात या फोनची विक्री २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. नवे फोन अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही वेबसाइटवरून बुक करता येणार आहेत. iphone 11 ची भारतातली सुरुवातीची किंमत ६४,९०० रुपये असेल. या किंमतीत 64GB स्टोरेज मिळणार आहे. iphone 11 चा 128GB आणि 256GB स्टोरेजचा फोनही असणार आहे. iphone 11 Pro ची सुरुवातीची किंमत ९९,९०० रुपये असेल तर iphone 11 Pro Max ची किंमत १,०९,९०० रुपये असेल. iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max च्या या किंमती 64GB स्टोरेजसाठी आहेत. iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max स्मार्टफोन्समध्ये 256GB आणि 512GB स्टोरेजचे पर्यायही आहेत. हे सर्व फोन २७ सप्टेंबरपासून भारतात उपलब्ध होणार आहेत. iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max हे दोन्ही फोन सर्जीकल ग्रेड स्टेनलेस स्टीलचे बनलेले आहेत. यात सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिला आहे. iPhone 11 Pro मध्ये ५.८ इंच आणि iPhone 11 Pro Max मध्ये ६.१ इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे. हे दोन्ही फोन मीडनाइट ग्रीन, स्पेस ग्रे, सिल्व्हर, व्हाइट आणि गोल्डन रंगात मिळतील.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31D2zNd

Comments

clue frame