नवी दिल्ली: सरकारी टेलिकॉम कंपनी आपले ग्राहक वाढवण्यासाठी सातत्याने नवनवे प्लान्स आणत आहे. काही जुने प्लान्सदेखील कंपनीने रिवाइज केले आहेत. कंपनीने आपल्या १८६ रु. आणि १८७ रु. च्या प्रीपेड प्लान्सना रिवाइज केलं आहे. १८६ रुपयांचा प्लान कंपनीने काही महिन्यांपूर्वी बंद केला होता. पण नुकताच तो पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या प्लानमध्ये खूप बदलदेखील करण्यात आले आहेत. ग्राहकांना या प्लानअंतर्गत आता दररोज ३ जीबीचा डेटा मिळणार आहे. आधी ही मर्यादा २ जीबी एवढी होती. यात डेली लिमीट संपल्यावर इंटरनेट स्पीड 40Kbps होतो. दररोज २५० मिनिटांचे कॉलिंग तर १०० एसएमएस मोफत मिळतात. या प्लानची व्हॅलिडीटी २८ दिवस आहे. १८७ रुपयांच्या प्लानमध्येही हेच फायदे मिळणार आहेत. १५३ रुपयांचा प्लान रिवाइज बीएसएनएलने १५३ रुपयांचा प्लानही नव्याने आणला आहे. आधी या प्लानमध्ये १०३ रुपयांचा टॉक टाइम आणि सोबत १०० रुपयांचा टॉप-अप मिळत होता. व्हॅलिडीटी २८ दिवसांची होती. आता यूजर्सना दररोज १.५ जीबी चा डेटा मिळणार आहे, शिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाहे मिळणार आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा प्लान कोणत्याही डेली कॉल लिमीटशिवाय येतो.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2nlJaRJ
Comments
Post a Comment