व्हॉट्सअॅप आता या फोन्सवर चालणार नाही!

नवी दिल्ली: सोशल मीडियासंदर्भात स्मार्टफोन युजरसाठी सर्वात वाईट बातमी कोणती असू शकते?... कदाचित हीच की, लोकप्रिय मेसेजिंग अॅप आपल्या फोनवर काम करू शकणार नाही. ही कल्पना नाही. या संदर्भात हाती आलेल्या वृत्तानुसार, व्हॉट्सअॅप काही आणि आयएसओ डिव्हाइससाठी आपला सपोर्ट संपुष्टात आणणार आहे. आता काही स्मार्टफोनसाठी व्हॉट्सअॅपची नवे अपडेट मिळणार नाहीत, असे व्हॉट्सअॅपने प्रसिद्द केलेल्या माहितीत म्हटले आहे. त्यामुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. या संदर्भात ने एक ट्विट केले आहे. यात आयएसओ ८ या जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या आयफोन्सवर आता व्हॉट्सअॅफ चालणार नाही, असे म्हटले आहे. हेच अँड्रॉइड २.३.७ आणि जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या अँड्रॉइड स्मार्टफोनलाही लागू होणार आहे. या सिस्टमसाठी ही सेवा १ फेब्रुवारी २०२० पर्यंत बंद होणार आहे. व्हॉट्स्अॅप अनइन्स्टॉल करू नका ज्या सिस्टमसाठी व्हॉट्सअॅप बंद होणार आहे, अशा सिस्टममध्ये व्हॉट्सअॅप इंस्टॉल असेल तर ते चालणार आहे. मात्र एकदा का हे अनइन्स्टॉल केले तर मग पुन्हा सुरू होणार नाही, हे महत्त्वाचे. आयओएससाठीची मुदत आहे १ फेब्रुवारी, २०२०, तर विंडोज फोनसाठीची मुदत आहे ३१ डिसेंबर, २०२०. म्हणून या सिस्टम वापरत असलेल्या युजरनी व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करू नका. इन ओएससाठीही व्हॉट्सअॅपचा सपोर्ट बंद या जुन्या सिस्टमवर चालणाऱ्या डिव्हाइसवर नवीन व्हॉट्सअॅफ अकाउंट क्रिएट होऊ शकणार नाही, अशी माहिती WABetaInfo ने दिली आहे. तसेच विद्यमान अकाउंट व्हेरिफाय देखील होऊ शकणार नाही, अशीही माहिती WABetaInfo ने दिली आहे. मात्र, अगोदारपासून व्हॉट्सअॅप इन्स्टॉल असेल तर मात्र ते काम करू शकणार आहे. >> अँड्रॉइड व्हर्जन २.३.७ किंवा या पेक्षा जुने ( १ फेब्रुवारी, २०२० पर्यंत) >> आयओएस ८ किंवा या पेक्षा जुने व्हर्जन ( १ फेब्रुवारी २०२० पर्यंत विंडोज फोन ऑपरेटिंग सिस्टम देखील ३१ डिसेंबर, २०१९ नंतर काम करणे बंद करणार आहे. या बरोबरच व्हॉट्सअॅप मायक्रोसॉफ्ट स्टोअरवरूनही हटवण्यात येणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MmDT5h

Comments

clue frame