मुंबई: वोडाफोनने नवा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. हा प्लान ४५ रुपयांचा ऑलराऊंडर प्रीपेड प्लान आहे. हा प्लान कंपनीच्या ३५ रु., ६५ रु., ९५ रु. , १४५ रु. आणि २४५ रुपयांच्या प्लान लिस्टमध्ये समाविष्ट आहे. या प्लानमध्ये फुल टॉक टाइम आणि ४८ दिवसांची व्हॅलिडिटी आहे. हा ४५ रुपयांचा प्लान वोडाफोनने काही ठराविक शहरांमध्येच सुरू केला आहे. बहुतांश शहरात जिथे आयडियासोबत वोडाफोनचं रेडिओ नेटवर्क इंटिग्रेशन पूर्ण झालं आहे, तिथे हा प्लान आणला आहे. जिथे वोडाफोनचा ४५ रुपयांचा प्लान आहे. तिथे आयडियाचा अॅक्टिव्ह पॅकच्या स्वरुपात ४५ रुपयांचा प्रीपेड प्लान आहे. हे आहेत फायदे या प्लानमध्ये ग्राहकांना ४५ रुपयांचा टॉकटाइम मिळणार आहे. वोडाफोनच्या या प्लानमध्ये यूजर्सना १०० एमबी ४जी/३जी/२जी डेटा मिळणार आहे. व्हॉइस कॉलसाठी प्रति सेकंद एक पैसा शुल्क असेल. या डेटासह असलेल्या प्लानची व्हॅलिडीटी २८ दिवस आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2mTKD1O
Comments
Post a Comment