अनुपम भाटावडेकर गेल्या आठवड्यात अॅपलने भन्नाट फिचर्ससह नवीन लाँच केले. तसंच आयफोन ६ आणि त्याच्या पुढच्या फोन्ससाठी आयओएस १३ हा ऑपरेटिंग सिस्टीममध्ये नवा अपडेट आणला. या अपडेटचे फिचर्स जाणून घेऊ या... ० डार्क मोड डार्क मोड डिस्प्लेमुळे आयफोनला एक वेगळाच लूक आणि फील दिला गेला आहे. हा कमी उजेड असलेल्या ठिकाणी वापरायला उपयुक्त आहे. यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होत नाही तसंच तुमच्या आसपासच्या लोकांनाही यामुळे फोनच्या लाइटचा त्रास होणार नाही. हा डार्क मोड सेटिंग्समध्ये जाऊन कंट्रोल सेन्टरमधून सहज चालू किंवा बंद करता येतो. तसंच शेड्युलसुद्धा करता येतो. यासाठी काही खास वॉलपेपर्ससुद्धा दिले गेले आहेत. ० परफॉर्मन्स ऑपरेटिंग सिस्टिमच्या नव्या अपडेटमध्ये परफॉर्मन्सवर भर देण्यात आला आहे. या ओएसमध्ये फेस आयडीने फोन आधीपेक्षा ३० टक्के लवकर अनलॉक होईल. तसंच अॅप्लिकेशन्स आधीपेक्षा दुप्पट लवकर ओपन होणार आहेत. त्याच प्रमाणे अॅप्लिकेशन अपडेट्सची साइजसुद्धा आता कमी ठेवण्यात येणार आहे. ०फोटो आणि व्हिडीओ नवीन फोटो टॅबमुळे फोटो अॅप्लिकेशनला नवीन आणि छान लूक देण्यात आला आहे. आता गॅलरीमधील फोटोज हे दिवस, महिना आणि वर्ष यानुसार बघता येतील. डुप्लिकेट फोटो स्क्रीनशॉट्स हे न दाखवल्यामुळे सर्वात चांगला फोटो गॅलरीमध्ये दिसतो. ठरावीक फोटोंची मेमरी मुव्ही हे अॅप्लिकेशन बनवते. आता फोटो एडिटिंगसाठी अधिक पर्याय दिले गेले आहेत. व्हिडीओ एडिटिंगमध्ये सुद्धा अधिक पर्याय दिले गेले असून यामध्ये फिल्टर्स, क्रॉप, रोटेट आणि एक्सपोजर इत्यादींचा समावेश आहे. ० कॅमेरा पोर्ट्रेट मोड एपीआयमध्ये त्वचा, केस आणि दात हे समाविष्ट केल्याने या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये पोर्ट्रेट फोटो अधिक चांगला येतो. ० प्रायव्हसी आणि सेक्युरिटी प्रायव्हसी आणि सेक्युरिटी याला अॅपल कंपनीनं कायमच प्राधान्य दिलं आहे. आता आपलं लोकेशन डिटेल्स कोणत्या अॅप्स बरोबर शेअर करायचे आणि किती करायचे, यावर आपण नियंत्रण मिळू शकतो. अॅप्लिकेशन वापरताना लोकेशन एकदाच शेअर करायचं की दरवेळी शेअर करायचं हा सुद्धा पर्याय आता उपलब्ध आहे. आता काही वेबसाइट्स आणि अॅप्लिकेशन्समध्ये लांबलचक फॉर्म्स न भरता आपल्या अॅपल आयडीने लॉगइन करता येईल. त्याचप्रमाणे जर आपल्याला एखाद्या ठिकाणी आपला ई-मेल आयडी शेअर करायचा नसेल तर हाइड माय ई-मेल (Hide My Email) हे फिचर वापरून अॅपल आपल्यासाठी युनिक ई-मेल आयडी तयार करते ज्यावर आलेले ई-मेल नंतर आपल्या ई-मेल वर मिळतात. ० मॅप्स नव्यानं डिझाइन केलेल्या मॅप्समध्ये आवडती ठिकाणं मार्क करता येतात, तसंच आवडत्या ठिकाणांचं कलेक्शन तयार करून ते शेअरसुद्धा करता येतं. मॅपमध्ये जायचं ठिकाण टाकल्यानंतर राइड ऑप्शनमध्ये ओला आणि उबेर बुक करण्याचा पर्याय दिला गेला आहे. ० सीरी अपडेटेड ऑपरेटिंग सिस्टिममध्ये सीरीमध्ये आणखीन फिचर्स देण्यात आली आहेत. आता सीरीला कमांड देऊन गाणं, पॉडकास्ट, ऑडिओबुक ऐकता येऊ शकतं. आता सीरीमध्ये भारतीय उच्चारातील इंग्रजीसुद्धा उपलब्ध आहे. ० शॉर्टकट्स शॉर्टकट्स या फिचरने अॅप्लिकेशन्स अधिक चांगल्या प्रकारे वापरता येतात. यामध्ये आपण विविध अॅप्लिकेशन्स वापरून आपल्या दैनंदिन गोष्टी सोप्या करू शकतो. यातील काही शॉर्टकट्स आधीपासूनच दिले गेले आहेत. ० मेमोजी आता संभाषण सुरु करताना आपलं नाव, फोटो, अॅनीमोजी किंवा मोनोग्राम शेअर करू शकता. मेसेजेसमध्ये वापरलेले मेमोजी स्टिकर म्हणून कीबोर्डमध्ये दिसतात आणि आता ते थर्ड-पार्टी अॅप्लिकेशन्समध्ये सुद्धा वापरता येतात. रिमाइंडर हे अॅप्लिकेशन नव्यानं डिझाइन केलं गेलं आहे. आता याला सीरीचा सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे. रिमाइंडरमध्ये फोटो, स्कॅन डॉक्युमेंट आणि वेब लिंकसुद्धा जोडता येऊ शकतात. ही सर्व फीचर्स वापरून अॅपलने आपली ऑपरेटिंग सिस्टीम दमदार केली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2mKJ7OZ
Comments
Post a Comment