जिओच्या 'या' प्लानवर रोज ५जीबी डेटा

नवी दिल्ली: ग्राहक हल्ली मोबाइल रिचार्ज प्लान निवडताना खूपच विचार करतात. स्वस्तात जास्तीत जास्त डेटा मिळणाऱ्या प्लानची निवड करण्यावर त्यांचा अधिक भर असतो. रिलायन्स जिओनं हीच बाब ओळखली असून, ग्राहकांसाठी प्रीपेड रिचार्ज प्लानचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. जिओकडे सध्या दररोज १.५ जीबी डेटापासून ५ जीबी डेटापर्यंतचे प्रीपेड रिचार्ज प्लान आहेत. जिओचे स्वस्त आणि जास्त डेटा मिळणारे अनेक प्लान आहेत. त्यात सर्वात स्वस्त १४९ रुपयांचा प्लान आहे. त्यात ग्राहकाला २८ दिवसांपर्यंत दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंग असेल. मोफत १०० एसएमएस आणि जिओ मोबाइल अॅप्स फ्री सबस्क्रिप्शनही मिळतं. जिओचा १९८ रुपयांचाही प्रीपेड प्लान आहे. त्यात ग्राहकाला रोज २ जीबी डेटा ऑफर केला आहे. २८ दिवसांची मुदत आहे. प्लान सबस्क्राइब केल्यावर अमर्यादित लोकल, एसटीडी कॉल आणि रोज १०० एसएमएस मोफत मिळतील. जिओ अॅपच्या मोफत सबस्क्रीप्शनसहीत हा प्लान मिळेल. जिओच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. त्याची मुदत २८ दिवसांची आहे. दररोज १०० एसएमएस मोफत मिळतील. जिओ अॅप सबस्क्रीप्शनही आहे. अमर्यादित लोकल, एसटीडी कॉलची सुविधाही आहे. जिओच्या ३९८ रुपयांच्या प्रीपेड प्लानची मुदत ७० दिवसांची आहे. त्यात दररोज २ जीबी डेटा मिळेल. अमर्यादित लोकल, एसटीडी कॉलिंग मोफत आणि रोज १०० एसएमएस मोफत मिळतील. ग्राहकांना जिओ अॅपचा मोफत अॅक्सेसही मिळतो. जिओचा ४९८ रुपयांचाही प्लान आहे. ९१ दिवसांची मुदत असेल. दररोज २ जीबी डेटा मिळेल. अमर्यादित लोकल, एसटीडी कॉलिंग मोफत आणि रोज १०० एसएमएस मोफत मिळतील. ग्राहकांना जिओ अॅपचा मोफत अॅक्सेसही मिळतो. जिओचा ४४९ रुपयांचाही प्लान आहे. ९१ दिवसांची मुदत आहे. रोज १.५ जीबी डेटा देण्यात आला आहे. अमर्यादित कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मोफत देण्यात आले आहेत. ग्राहकांना जिओ अॅपचा मोफत अॅक्सेसही मिळेल. मोबाइल इंटरनेटवर व्हिडिओ पाहत असाल तर ५०९ रुपयांचा जिओ प्लान उत्तम आहे. २८ दिवसांच्या मुदतीसह ग्राहकांना रोज ४ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अमर्यादित कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मोफत देण्यात आले आहेत. ग्राहकांना जिओ अॅपचा मोफत अॅक्सेसही मिळेल. जिओचा ७९९ रुपयांचाही प्लान आहे. त्याची मुदत २८ दिवसांची आहे. दररोज ५ जीबी डेटा मिळेल. याशिवाय अमर्यादित कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मोफत देण्यात आले आहेत. ग्राहकांना जिओ अॅप मोफत सबस्क्रीप्शनही करता येणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ig7HPL

Comments

clue frame