जीमेलच्या या ७ नव्या गोष्टी खूपच उपयोगी

मुंबई: बहुतांश लोक जी-मेल सुरू करतात, सेट अप करतात. वापरतात. बस्स. त्यापुढे ते काहीच करत नाहीत. पण बारकाईने पाहिलं तर अशा अनेक गोष्टी करू शकतं ज्या तुम्हाला माहित नसतील. कोणत्या ते पाहू - १) सुपरफास्ट फॉरवर्डिंग शॉर्टकट तुम्ही अनेकदा सारख्याच अॅड्रेसवर मेल फॉरवर्ड करत असता. यासाठी तुम्ही एक टू क्लिक शॉर्टकट तयार करा. त्यासाठी जीमेलवर फॉरवर्ड नावाचं नवं लेबल तयार करा. स्क्रीच्या टॉपला हा लेबल आयकॉन क्लिक करून 'Forward' असं टाइप करून एन्टर बटण दाबा. झॅपिअरचा वापर करा आणि प्रत्येक स्टेप पहा. २) अटॅचमेंट स्टोरेज ऑटोमेट करा Zap for Dropbox किंवा Zap for Google Drive सारख्या पर्यायांचा वापर अटॅचमेंट्सचा डेटा स्टोअर करण्यासाठी करा. ३) जीमेलला सेफकिपिंगसाठी स्टार्ड स्लॅक मेसेज पाठवा स्लॅकमधील जे तुम्हाला सेव्ह करायचं आहे त्याला स्टार करा. Zapier Zap मधून जीमेल आणि स्लॅक अकाउंटच्या सर्व्हिससाठी कनेक्ट व्हा ४) एव्हरनोट कनेक्शन तुमच्या फेवरिट एव्हरनोट नोटबुकमध्ये मेसेज लेबल्ड करून ठेवा ५) महत्त्वाची ट्विटर अॅक्टिव्हिटी तुमच्या इनबॉक्समध्ये Zapier Zap च्या सहाय्याने ट्विटर युझरनेम किंवा कोणत्याही नावाने ट्विट सर्च करता येईल. एकदा ही नावं सेट करून ठेवली की ऑनगोइंग अलर्ट्स मिळतील. ६) स्मार्टफोन नोटिफिकेशन्स इनबॉक्सशी सिंक करा हा पर्याय केवळ अँड्रॉइड यूजर्ससाठी उपलब्ध आहे. IFTTT ओपन करा आणि कनेक्ट बटण क्लिक करा. लॉग इन केल्यावर तुमचा स्मार्टफोन जीमेलशी कनेक्ट होईल. अट एकच तुमच्या फोनमध्ये तेच जीमेल अकाउंट असायला हवं. त्यानंतर स्मार्टफोनचे नोटिफिकेशन अलर्ट्स इनबॉक्समध्ये येतील. ७) फोरकास्ट अलर्ट मिळवा दुसऱ्या दिवशीच्या हवामानाचे अलर्टही IFTTT द्वारे मिळतात.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2mxCZtd

Comments

clue frame