बेंगळुरू: मोहिमेचा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे. चंद्राच्या ज्या कक्षेत कोणीही जाऊ शकलं नाही, तिथे आपण पोहोचणार आहोत. सॉफ्ट लँडिंग करून आपण नवा इतिहास रचणार आहोत. आम्ही फक्त रात्रीची वाट पाहत आहोत, असं इस्रोचे चेअरमन यांनी सांगितलं. आज रात्री दीड वाजता चांद्रयान-२ चे लँडर असलेले 'विक्रम' चांद्रभूमीवर उतरणार आहे. या ऐतिहासिक मिशनकडे केवळ भारताचंच नव्हे तर जगभरातील खगोलप्रेमींचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर इस्त्रोचे चेअरमन सिवन यांनी ही प्रतिक्रिया दिली. चांद्रयान-२ विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिग केल्यास अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश ठरेल. या आधी रशिया, अमेरिका आणि चीनने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चंद्रावर अलगद उतरणे हा रोमांचकारी अनुभव असेल. इस्रोने असा अनुभव यापूर्वी कधीच घेतलेला नाही. चांद्रयान-१ मोहिमेच्या वेळी चंद्राच्या कक्षेत जाणेच शक्य झाले होते, असं सिवन म्हणाले. या सॉफ्ट लँडिंगचं रात्री १ वाजून १० मिनिटांनी दूरदर्शन, इस्रोचे संकेतस्थळ, युट्यूब, फेसबुक आणि ट्विटरवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. चांद्रयान-२ पृथ्वीच्या उपग्रहाच्या दक्षिणी ध्रुवावर उतरेल. हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: इस्रोच्या बेंगळुरू केंद्रात उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत शाळेतील ६०-७० विद्यार्थीही असतील.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Lt9Ub7
Comments
Post a Comment