इंटरनेट स्पीडमध्ये भारत मागे; सिंगापूर अव्वल

नवी दिल्ली: जगभरात स्पीडमध्ये २१.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर ब्रॉडबँडचा स्पीड ३७.४ टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, भारतातील इंटरनेट स्पीड सरासरीपेक्षा कमी आहे. इंटरनेट स्पीडच्या बाबतीत सिंगापूर अव्वल स्थानी आहे. Ookla या कंपनीने स्पीडटेस्ट ग्लोबल निर्देशांक रिपोर्टच्या आधारे ही माहिती दिली. भारतात मोबाइलच्या वापरात १६.३ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. दुसरीकडे ब्रॉडबँडच्या स्पीडमध्ये २८.५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मात्र, इंटरनेट स्पीडमध्ये भारत पिछाडीवरच आहे. याबाबतीत सिंगापूर अव्वल स्थानी आहे. सिंगापुरात ब्रॉडबँडच्या स्पीडमध्ये ५.६ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तर ५ जी नेटवर्क असलेल्या दक्षिण कोरियात मोबाइल डाउनलोडचा वेग १६५.९ टक्क्यांनी वाढला आहे. भारत, पाकिस्तानात सरासरीपेक्षा कमी वेग दक्षिण आशियाई देशांत भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये इंटरनेट स्पीड सरासरीपेक्षा कमी आहे. उर्वरित कंबोडिया, फिलिपाइन्स, व्हिएतनाम आणि जॉर्डनसारख्या देशातही इंटरनेट स्पीड कमी आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2N4dtbf

Comments

clue frame