व्हिवोचा स्वस्त आणि तगडा स्मार्टफोन येतोय!

नवी दिल्ली : व्हिवो कंपनीचा तगडा आणि खिशाला परवडणारा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात येतोय. व्हिओच्या यू सिरीजमधील 'व्हिवो यू १०' हा स्मार्टफोन लाँच होणार असल्याची घोषणा सोमवारी कंपनीनं केली. यू सिरीजचा हा पहिला स्मार्टफोन असेल. अॅमेझॉनवर एक्स्क्लुझिव्ह, तसंच कंपनीच्या संकेतस्थळ आणि 'ई-स्टोर'वरही तो उपलब्ध असेल. अॅमेझॉनवर स्मार्टफोनचा टिझर लाँच व्हीवो कंपनीने या स्मार्टफोनचे फीचर टीझ केले आहेत. 'व्हीवो यू १०' स्मार्टफोन हा बेस्ट-इन-क्लास क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर पॉवर्ड असेल. या स्मार्टफोनची बॅटरी दीर्घकाळ टिकणारी असून, फास्ट चार्जिंगसोबत मिळेल. अॅमेझॉनने या स्मार्टफोनचा टीझर पेजही लाइव्ह केला आहे. वृत्तानुसार, या व्हिवो यू सिरीजच्या स्मार्टफोनची किंमत १० ते २० हजार रुपयांदरम्यान असेल. या स्मार्टफोनची शाओमी, ओप्पो आणि रिअलमी या स्मार्टफोनशी स्पर्धा असेल. २० सप्टेंबरला 'व्हिवो व्ही १७ प्रो' लाँच होणार व्हीवोनं अलीकडंच 'झेड' आणि 'एस' सिरीजचे नवे स्मार्टफोन बाजारात आणलेत. झेड सिरीजमधील व्हिवो झेड १ प्रो आणि व्हिवो झेड १ एक्स हे दोन फोन भारतात लाँच केले आहेत. त्यानंतर आता व्हिवो व्ही १७ प्रो हा स्मार्टफोन भारतात २० तारखेला लाँच करणार असल्याची घोषणा कंपनीनं केली आहे. ३२ मेगापिक्सल ड्यूल पॉप-अप सेल्फी असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे, असा कंपनीचा दावा आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HWfmlU

Comments

clue frame