फोनचा अतिवापर घातकच!

'जिवलगा' मालिकेतील सालस भूमिकेनं घराघरात पोहोचली. अशा या गुणी अभिनेत्रीची टेक्नॉलॉजीविषयीची मतं जाणून घ्या... सध्या कोणता वापरत आहेस? आयफोन ७ प्लस. स्मार्टफोनशिवाय इतर कोणते गॅजेट्स वापरतेस? आय पॅड आणि लॅपटॉप. सर्वात पहिलं वापरलेलं गॅजेट कोणतं? वॉकमन. कोणतं फिचर जास्त भावतं? फोनचा कॅमेरा. कारण मला फोटो काढायची हौस आहे. आयुष्यातील मौल्यवान क्षण कॅमेऱ्यात चटकन कैद करून ठेवता येतात. कोणतं अॅप जास्त आवडतं? का? गुगल नोट्स हे अॅप आवडतं. हे अॅप फारच उपयोगी आहे. यामध्ये बऱ्याच गोष्टींची नोंद सहज ठेवता येते. तुझा टेक्नॉलॉजीतला गुरु कोण? माझे बाबा. ते टेकसॅव्ही असून टेक्नॉलॉजीचं अपडेट ठेवतात. गॅजेटशिवाय राहण्याचा अनुभव कसा होता? एकदा माझा फोन बिघडला होता. तेव्हा घरच्यांशी संपर्क होऊ शकला नव्हता. त्या काळजीत होते. पण फोनशिवाय आपण जगू शकतो हे त्या एका अनुभवानं शिकवलं. सोशल साइट्सवर अॅक्टीव्ह आहेस का? इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी अॅक्टीव्ह असते. दिवसातला किती वेळ सोशल मीडियावर घालवतेस? पूर्वी सोशल मीडियावर तासन् तास ऑनलाइन असायचे. पण आता वापर कमी केला आहे. रात्री दहा नंतर इंटरनेटचा वापर कमी करते आणि ठरवून झोपायला जाताना खोलीत फोन घेऊन जात नाही. शब्दांकन- शब्दुली कुलकर्णी


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/300ONqY

Comments

clue frame