ओप्पोचा हा फोन ३० मिनिटांत फुल्ल चार्ज होणार

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पोनं फास्ट चार्जिंग टेक्नलॉजीची घोषणा केली आहे. कंपनी ही टेक्नलॉजी लवकरच ' एस' स्मार्टफोनमध्ये वापरणार आहे. ' रेनो एस' ६५ वॅटच्या फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत ऑक्टोबरमध्ये लाँच होणार आहे. ५ मिनिटात २७ टक्के चार्ज या टेक्नलॉजीच्या मदतीने युजर्स फोनमध्ये दिलेली ४०००एमएच बॅटरी ३० मिनिटांत फुल्ल चार्ज करू शकतात. असा दावा कंपनीनं केला आहे. ५ मिनिटांत फोन २७ टक्के चार्ज होतो. या टेक्नलॉजीमध्ये कस्टमाइज आणि अॅडव्हान्स कंपनेंट्स, डिजाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसची मदत घेतली आहे. या प्रोसेसच्या मदतीनं चार्जिंगची क्षमता वाढवण्याच्या बरोबर फोन गरम होण्यापासून रोखते. चार्जिंग बोर्ड खराब असल्यास चार्जिंग बंद होणार कंपनीनं सुरक्षेच्या कारणास्तव नवीन डिजाइनच्या हार्डवेअरची घोषणा केली आहे. या हार्डवेअरमुळं फोन ओव्हरहिट होणार नाही. त्याचबरोबर चार्जिंग बोर्ड खराब असल्यास फोनचं चार्जिंग आपोआप थांबणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30cPv3v

Comments

clue frame