वोडाफोनचा ५९ रुपयांचा प्लान, रोज १ जीबी डेटा

मुंबई: टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धा भयंकर वाढली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या रोज नवनवे टॅरिफ प्लान्स घेऊन येत आहेत. जिओमुळे टेलिकॉम कंपन्यांच्या त्रासात भर पडल्यापासून ग्राहकांना मात्र या ऑफर्सचा लाभ होत आहे. आता वोडाफोनने अवघा ५९ रुपयांचा प्लान आणला आहे. यात दररोज १ जीबी डेटाही मिळणार आहे. दररोजचं डेटा लिमिट संपलं की यूजर्सना मिळणारा इंटरनेटचा स्पीड घटतो. म्हणूनच हे लहान लहान सॅशे पॅक ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागले आहेत. ग्राहकांना कमी किंमतीत अधिक डेटा वापरायला मिळत असल्याने या पॅक्सची चलती आहे. वोडाफोनच्या ५९ रुपयांच्या पॅकची वॅलिडीटी ७ दिवसांची आहे. दररोज एक जीबी डेटा मोफत म्हणजेच ग्राहकांना ५९ रुपयांत ७ जीबी डेटा मिळणार आहे. वोडाफोनने काही दिवसांपूर्वी १६ रुपयांचाही एक पॅक लॉंच केला होता. रिलायन्स जिओचा हाच पॅक ७ दिवसांच्या मुदतीचा आहे पण त्याची किंमत ५२ रुपये आहे. यात दररोज १.०५ जीबी डेटा मिळणार आहे. यात ७० एसएमएसदेखील मोफत आहे. तसेज जिओ अॅप्सचं फ्री सबस्क्रीप्शनदेखील मिळत आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Q3VaVJ

Comments

clue frame