नवी दिल्लीः चीनची कंपनी ओप्पोने आपली ' झे१ एक्स ' स्मार्टफोन भारतात आज लाँच करणार आहे. 'झे' सिरीजचा हा दुसरा स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन लाँच होण्याच्या आधीच कंपनीनं प्रदर्शित केलेल्या टीझरमुळं स्मार्टफोनविषयी युजर्सची उत्सुकता वाढली आहे. 'विवो झे१'मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेराबरोबरच, ४,५०० एमएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. विवो झे१ एक्स ६ सप्टेंबरला १२ वाजता लाँच झाला आहे. कंपनीच्या फेसबुक पेजवर लाइव्ह पाहता येणार आहे.कंपनीनं मात्र अद्याप फोनची किंमत गुलदस्त्यात ठेवली आहे. विवो झे१ स्पेसिफिकेशन फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७१२ जी प्रोसेसरचा पॉवर्ड राहणार आहे. तसंच फोनमध्ये ४,५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, स्मार्टफोनमध्ये इन- डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार आहे. स्मार्टफोनमध्ये ६.३८ इंचाचा एमोलेड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2A7ufxH
Comments
Post a Comment