रिलायनस जिओ फायबर लाँच; हे आहे खास

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ गिगा फायबर ५ सप्टेंबरला लाँच झालं. कंपनीनं गिगा फायबरचे ६ प्लॅन ग्राहकांसाठी आणले असून या प्लॅनची किंमत ६९९ पासून सुरू आहे. प्रीमियम प्लॅनची किंमत ८,४९९ रुपये आहे. प्रिमीयम प्लॅनमध्ये युजर्सना १ जीबीपीस पर्यंत इंटरनेट कनेक्शन मिळणार आहे. त्याचबरोबर एचडी टी.व्ही मोफत मिळणार आहे. जाणून घेऊया जिओ फायबरच्या ऑफर आणि डिस्काउंटबाबत या खास गोष्टी १) सबस्क्रिप्शन प्लॅन जिओ फायबरनं युजर्ससाठी ६ प्लॅन ऑफर केले आहेत. या ६ प्लॅनचे दर हे प्रत्येक महिन्यानुसार असणार आहेत. ६९९ रुपये (ब्रॉन्ज), ८४९ रुपये (सिल्व्हर), १२९९ रुपये (गोल्ड), २४९९ रुपये(डायमंड), ३९९९ (प्लॅटिनम) आणि ८४९९ रुपये(टायटेनियम). जिओ फायबरसोबत युजर्सना १०० एमबीपीस ते १ जीबीपीसपर्यंत स्पीड मिळणार आहे. २) फ्री सर्व्हिस गिगा फायबरची बीटा ट्रायल सर्व्हिस वापरणाऱ्या ग्राहकांना दोन महिन्यांसाठी मोफत सर्व्हिस मिळणार आहेत. ३) असं मिळणार जिओ फायबरचं कनेक्शन गिगा फायबरचं कनेक्शन घेण्यासाठी जिओच्या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे. त्यानंतर, तुमच्या शहरातील जिओ कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून कनेक्शन आणि राऊटर इन्स्टोल करून घ्या. इन्स्टोल झाल्यानंतर दोन तासांत अॅक्टिव्ह होईल. ४) इन्स्टोलेशन शुल्क सुरुवातीला जिओ फायबरच्या इन्स्टोलेशन शुल्क कमी होते.. मात्र, आता जिओचं इंटरनेट राउटरची किंमत २,५०० आहे. ५) फ्री एच-डी टी.व्ही कंपनी जिओ फायबरच्या वेलकम ऑफरमध्ये ग्राहकांना एच-डी टी.व्ही मोफत मिळणार आहे. मात्र, फक्त गोल्ड किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीचा पॅक घेतल्यास मोफच एच-डी टी.व्ही मिळणार आहे. ६) जिओ फायबर केबल टी.व्ही जिओ फायबर कनेक्शनबरोबर टी.व्ही सर्व्हिस घेण्यासाठी ग्राहकांना सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. ही सर्व्हिस फक्त डीटीएचच्या माध्यमातूनच मिळणार आहे. केबल सर्व्हिससाठी जिओ मोफत सेट-टॉप बॉक्स देखील मिळणार आहे. या सेट-टॉप बॉक्समध्ये अनेक फिचर असून त्यात व्हिडिओ कॉलिंगसोबत मिक्स रिअॅलिटी सर्व्हिस मिळणार आहे. ७) फ्री- व्हॉइस कॉल जिओ होम फोनमध्ये कंपनी ब्रॉडबँड कनेक्शनसोबतच लँडलाइन सेवा देण्यात येत आहे. या सेवेमुळं ग्राहक देशभरात फ्री व्हॉइस कॉल करू शकणार आहेत. तसंच कमी दरात आंतरराष्ट्रीय फोन करू शकणार आहेत. ८) जिओ अॅप्स जिओनं ग्राहकांच्या मनोरंजनासाठी जिओ अॅप्सचं फ्री अॅक्सेस दिला आहे. तसंच युजर्सना ओटीटी अॅप्स सबस्क्रिप्शन मिळणार आहे. ९) फर्स्ट डे फर्स्ट शो फर्स्ट डे फर्स्ट शो या ऑफरमध्ये ग्राहकांना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच घरी पाहू शकणार आहे. ही सेवा पुढच्या वर्षी लाँच होणार आहे. १०) वेलकम ऑफर जिओ फायबरद्वारे लाँच होणारे सर्व वेलकम ऑफरमध्ये यामध्ये युजर्सना पाच हजार किमत असलेली जिओ होम गेटवे सेवासोबत ६,४०० रुपयांचा जिओ ४के सेट-टॉप बॉक्स मिळणार आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UvEULI

Comments

clue frame