खुशखबर! आयफोनच्या किंमतीत घट

नवी दिल्लीः लाँच झाल्यानंतर अॅपलनं त्यांच्या जुन्या व्हेरियंटच्या किंमतीत घट केली आहे. आयफोन ११ची भारतात सुरूवातीची किंमत ६४,९९० रूपये आहे. कंपनीनं आयफोन सात ते आयफोन एक्सपर्यंतच्या किंमतीत १० ते ३० टक्क्यांपर्यंत किंमत कमी केली आहे. आयफोनच्या किंमतीत घट झाल्यानं ग्राहकांना आयफोन २० हजार रूपयांनी स्वस्त मिळणार आहे. तसंच काही दिवसात सुरू होणाऱ्या फेस्टिव्ह सिझनमध्ये आयफोन अधिक स्वस्त होण्याची शक्यता आहे. आयफोनच्या विक्रीत घट आयफोनच्या किंमत कमी करून कंपनी भारतात स्मार्टफोन बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. अॅपच्या या रणनीतिमुळं सॅमसंग आणि वनप्लसच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो. काउंटरपॉइंट रिसर्चनुसार २०१८मध्ये अॅपल आयफोनच्या विक्रीत घट होऊन १७ लाख युनिट पर्यंत पोहचली होती. तर, २०१७मध्ये विक्री ३२ लाख होती. मॉडल जुनी किंमत नवीन किंमत आयफोन XS ६४जीबी ९९,९०० रुपये ८९,९९० रुपये आयफोन XS २५६जीबी १,१४,९०० रुपये १,०३,९०० रुपये आयफोन XR ६४जीबी ५९,९०० रुपये ४९,९०० रुपये आयफोन XR १२८जीबी ६४,९०० रुपये ५४,९०० रुपये आयफोन ८ प्लस ६४जीबी ६९,९०० रुपये ४९,९०० रुपये आयफोन ८ ६४जीबी ५९,९०० रुपये ३९,९०० रुपये आयफोन ७ प्लस ३२जीबी ४९,९०० रुपये ३७,९०० रुपये आयफोन ७ प्लस १२८जीबी ५९,९०० रुपये ४२,९०० रुपये आयफोन ७ ३२जीबी ३९,९०० रुपये २९,९०० रुपये आयफोन ७ १२८जीबी ४९,९०० रुपये ३४,९०० रुपये


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LLN4fa

Comments

clue frame