नवी दिल्लीः ''बद्दल आयफोनप्रेमीमध्ये उत्सुकता असतानाच अॅपलनं आयफोन लाँचिंग सोहळ्याचा एक प्रीकॅप व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून आयफोन युजर्ससाठी एक सिक्रेट मेसेज देण्यात आला आहे. आयफोनचा लाँचिंग सोहळा पार पाडल्यानंतर कंपनीकडून पूर्ण सोहळ्याचा एक प्रीकॅप व्हिडिओ शेअर केला जातो. यावेळीही कंपनीनं दोन मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र, यावेळी या व्हिडिओत आयफोनप्रेमींसाठी एक खास संदेशही देण्यात आला आहे. अॅपलच्या प्रीकॅप व्हिडिओत आयफोन ११, ११ प्रो, वॉच, अॅपल टी.व्ही आणि आयपॅडची एक झलक पाहायला मिळतेय. पण, १.२३ मिनिटांवर व्हिडिओ थांबवल्यास तिथं 'एरर ०९१०२०१९' असं पाहायला मिळतं. खरं तर हाच युजर्ससाठी अॅपलचा संदेश आहे. एररच्या खाली' तुम्ही खरेखुरे अॅपल फॅन्स असाल तर तुम्हाला हा संदेश नक्कीच दिसेल'. असा मेसेज देण्यात आला आहे. तसंच काही कोड नंबर देखील देण्यात आले आहेत. हे कोड नंबर डिकोड केल्यानंतर “So you took the time to translate this? We love you.” हा मेसेज दिसतो. आयफोनच्या विक्रीसाठी युजर्सना आकर्षित करण्यासाठी अॅपलनं हा नवीन फंडा वापरल्याचं बोललं जातं आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32Eps2Q
Comments
Post a Comment