नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन बनवणारी कंपनी सॅमसंगने भारतात आपला फेस्टिव्ह सीजन सुरू केला आहे. ब्लू फेस्ट असं या सीजनचं नाव असून ५ सप्टेंबरपासून याला सुरुवात होणार आहे. १२ सप्टेंबरपर्यंत हा फेस्टीव्ह सेल सुरू राहणार आहे. या सेलमध्ये सॅमसंगच्या स्मार्टफोन्ससह टीव्ही, होम साहित्य, स्मार्टवॉच आणि अॅक्सेसरीजवर तब्बल ५५ टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. सॅमसंगच्या उत्पादनावरील डिस्काउंटसह ग्राहकांना अनेक अतिरिक्त ऑफर्स मिळणार आहेत. या ऑफर्समध्ये २ हजार रुपयांपर्यंत मोबीक्विक सुपरकॅश, मेक माय ट्रिप आणि स्टे बुकिंगवर २५ टक्के डिस्काउंटचे व्हाउचर्स दिले जाणार आहे. तसेच ओयोकडून १० हजार रुपयांपर्यंतचे व्हाउचर्स दिले जाणार आहे. खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी एक्सचेंजची ऑफरही देत आहे. सॅमसंग ब्लू फेस्टमध्ये Galaxy Note 10, Galaxy S10+, Galaxy Note 9, Galaxy A80 आणि इतर सर्व सॅमसंगच्या फोनववर जबरदस्त एक्सचेंज ऑफरचा पर्याय आहे. गॅलेक्सी एम सीरिजच्या स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर मिळणार आहेत. या सेलदरम्यान ग्राहकांना Harman Kardon आणि JBL च्या ऑडियो उत्पादनावर आकर्षक डिस्काउंट ऑफर्स मिळणार आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZxyMZ5
Comments
Post a Comment