नवी दिल्लीः चायनीज कंपनी वनप्लसचा बहुप्रतिक्षीत '' आणि 'वनप्लस ७ टी' सिरीजची लाँचिंग डेट जाहीर केली आहे. २६ सप्टेंबरला कंपनी एका सोहळ्यात '' सीरिज आणि 'वनप्सल टी.व्ही' लाँच करणार आहे. तसंच, कंपनीनं या डिव्हाइसच्या फिचर्सची माहितीही जाहीर केली आहे. 'वनप्लस टी' सिरीजमध्ये कंपनी 'वनप्लस ७टी' आणि 'वनप्लस ७ टी प्रो' लाँच होणार आहेत. 'वनप्लस ७टी'चे स्पेसिफिकेशन या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फ्रिंगरप्रिंट सेन्सरसोबत ६.५५ इंचाचा अमॉल्ड डिस्प्ले देण्याची शक्यता आहे. १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज वेरिएंट असतील. फोटोसाठी ४८ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासोबत १२ मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स आणि १६ मेगापिक्सल कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तसंच फोनमध्ये ३,८०० एमएच बॅटरीची क्षमता असेल. 'वनप्लस ७टी प्रो'चे स्पेसिफिकेशन या स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फ्रिंगरप्रिंट सेन्सरसोबत ६.५५ इंचाचा अमॉल्ड क्यूएचडी प्लस डिस्प्ले देण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन कंपनी फक्त ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज वेरिएंट मध्येच लाँच करण्याची शक्यता आहे. फोटोसाठी ४८ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासोबत ८ मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स आणि १६ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेन्स असण्याची शक्यता आहे. तसंच फोनमध्ये ४,०८५ एमएच बॅटरीची क्षमता असेल. 'वनप्लस टीव्ही'चे स्पेसिफिकेशन वनप्लस टी.व्हीमध्ये ओएलइडी पॅनल नसणार असं सांगण्यात येत आहे. एका अहवालानुसार, वनप्लस टीव्ही ५५ इंच वेरियंटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. या टीव्हीचा हाय-एंड वेरियंट 4kHDR डिस्प्लेला सपोर्ट करणार. ८ इनबिल्ड स्पिकर टीव्हीमध्ये आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Lz5xfR
Comments
Post a Comment