प्रतीक्षा संपणार; जिओ गिगाफायबर आज होणार लाँच

मुंबई: दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर आज रिलायन्सचं लाँच होणार आहे. रास्त दरात वेगवान इंटनेट सुविधा यामुळे ग्राहकांना मिळणार आहे. कंपनीने मागील वर्षी ५ जुलैला याची घोषणा केली होती. गेले अनेक महिने देशातील ठराविक शहरांमध्ये जिओ गिगाफायबर प्रायोगिक तत्वावर सुरू होतं. १२ ऑगस्टला रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जिओ फायबरच्या लाँचिंगची घोषणा करण्यात आली. जिओ गिगाफायबरचा प्लान ७०० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत आहे. आजपासून लोकांना हे प्लान्स घेता येणार आहे. कनेक्शनसोबत ग्राहकांना 4K सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे. या सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून एकावेळी चार जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकणार आहेत. याव्यतिरिक्त इतर अनेक फिचर्स जिओ गिगाफायबरच्या ग्राहकांना मिळणार आहेत.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34kGYuN

Comments

clue frame