One Plus Q1, One Plus Q1Pro : वन प्लस या मोबाईल कंपनीन दिल्लीतील एका सोहळ्यात वन प्लस टीव्ही लाँच केला आहे. याच कार्यक्रमात वन प्लस सेव्हन-टी हे मोबाईल मॉडेलही लाँच करण्यात आले आहे. Android 9 Pie वर चालणाऱ्या या स्मार्ट टीव्हीचे डिझाईन आणि लीक झाले होते. त्यामुळे टीव्ही चर्चेत आला होता. वन प्लसच्या मोबाईलप्रमाणेच कंपनीचा टीव्ही देखील भन्नाट फिचर्स घेऊन आला आहे.
सासरच्यांनी तिचं लग्न लावलं सलमानखानबरोबर
काय आहे वन प्लस स्मार्ट टीव्ही?
- स्मार्ट टीव्ही आणि तुमचा स्मार्ट फोन सिंक करता येणार
- रिमोटप्रमाणे टीव्ही स्मार्ट फोनवरूनही कंट्रोल करता येणार
- फोनच्या डिस्प्लेवर स्क्रोल केल्यानंतर टीव्हीची स्क्रीनही स्क्रोल होणार
- टीव्हीवरचा रिअर टाईम स्क्रीन शॉट फोनमध्येही घेता येणार
- टीव्ही सुरू असताना, तुम्हाला फोन आल्यास टीव्हीचा आवाज आपोआप दहा टक्क्यांवर येणार
- सर्वोत्तम साऊंट आणि पिक्चर क्वालिटीचा कंपनीचा दावा
- आठ हाय क्लालिटी साऊंट स्पिकर्स
- टीव्हीला मिळणार क्रिस्टल क्लिअर साऊंड; 50 वॉटचे साऊंड आऊटपूट मिळणार
- टीव्हीमधील इन बिल्ट कास्टिंग सुविधेमुळे एकाच वेळी टीव्ही आणि मोबाईलवर गेम खेळता येणार
अपुरी झोप करते काम जीवनावर परिणाम
काय आहे किंमत?
वन प्लस कंपनीने टीव्ही लाँच करताना, दोन मॉडेल लाँच केली आहेत. टीव्ही क्यू-वन आणि टीव्ही क्यू-वन प्रो, अशी ही दोन मॉडेल्स आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये फारसा फरक नाही. त्यांना ५५ इंचांचा डिस्प्ले मिळाला आहे. फिचर्सच्याबाबतीतही दोन्ही मॉडेल्स सारखी आहेत. पण, दोन्ही मॉडेलची किंमत मात्र, वेगवेगळी आहे. वन प्लस टीव्ही क्यू-वनची किंमत ६९ हजार ९०० तर, वन प्लस क्यू-वन प्रोची किंमत ९९ हजार ९०० रुपये असणार आहे. वन प्लस क्यू-वन प्रोमध्ये 50 वॉटचे साऊंड आऊटपूट दोन बार मिळणार आहेत. त्यातून मिळाणारा साऊंट एक्सपिरियन्स भन्नाट असणार आहे. विशेष म्हणजे अॅमेझॉन अॅपवर ग्रेट इंडिया फेस्टिवल स्कीममध्येही हा टीव्ही तुम्हाला खरेदी करता येणार आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2o76hjg
Comments
Post a Comment