आता गुगल ऐकणार नाही तुमचं संभाषण; 'हे' करा

नवी दिल्ली: व्हॉइस असिस्टंटच्या माध्यमातून , अॅपल आणि अॅमेझॉनसारख्या अनेक टेक कंपन्या त्यांच्या व्हॉइस असिस्टंटसोबत होणाऱ्या यूजर्सच्या संभाषणाचा काही भाग ऐकतात असं अलीकडेच समोर आलं होतं. यूजर्सना हे माहित नसतं की त्यांचं बोलणं आणखी कुणी ऐकतंय. काही यूजर्स यामुळे नाराजही होते. मात्र यामागे कंपन्यांचं उद्दिष्ट आपल्या सहकाऱ्यांमध्ये सुधारणा करणं हे होतं. अॅपलने आपला हा कार्यक्रम आधीच बंद केला आहे. आता गुगलनेही आपल्या व्हॉइस असिस्टंटसोबत युजर्सचं बोलणं ऐकणं बंद करण्याची घोषणा केली आहे. आता यूजर्स त्यांच्या बोलण्याचा वापर केला जावा की केला जाऊ नये याचा कंट्रोल स्वत:कडे ठेवू शकणार आहेत. त्यासाठी तुम्लाहा सेटिंगमध्ये जाऊन 'व्हॉइस अँड ऑडियो अॅक्टिव्हिटी' VAA हा पर्याय निवडला तर तुमचा ऑडियो डेटा स्टोअर केला जाणार नाही. त्याशिवाय जुन्या संभाषणाचे ऑडिओही डिलीट करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2leb419

Comments

clue frame