शाओमीचा 'हा' टीव्ही शानदार; स्पर्धा दमदार

नवी दिल्ली: स्मार्टफोन बाजारात कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असतानाच, आता टीव्ही निर्मितीतही चढाओढ सुरू झालीय. स्मार्टफोनची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा बेजल-लेस एम आय टीव्ही प्रो उद्या, २४ सप्टेंबरला लाँच होणार आहे. या टीव्हीमध्ये बेजल नाहीत. 8k डिकोडिंग सपोर्ट करणारा हा पहिला टीव्ही असेल. शाओमीचा एमआय टीव्ही प्रो २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह उपलब्ध असेल. अन्य स्मार्ट टीव्हीमध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज किंवा २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज असतं. या टीव्हीची स्टोरेज क्षमता वनप्लस टीव्ही क्यू वन आणि मोटोरोलाच्या स्मार्ट टीव्हीच्या तुलनेत दुप्पट आहे. शाओमीच्या या टीव्हीमध्ये 12nm Amlogic T972 64-bit प्रोसेसर असेल. कंपनीनं अलीकडेच याबाबत दुजोरा दिला आहे. या प्रोसेसरमुळं टीव्हीचा परफॉर्मन्स ६३ टक्के अधिक चांगला आणि ५५ टक्के वीज बचत होईल, असा कंपनीचा दावा आहे. एमआय टीव्ही प्रो ४३ इंच, ५५ इंच आणि ६५ इंच अशा तीन व्हेरियंटमध्ये असेल. यात अॅल्युमिनिअम अलॉय फ्रेम, थ्रीडी कार्बन फायबर बॅक आणि अॅल्युमिनिअम बेस देण्यात आला आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत म्हणाल तर, शाओमीची पॅचवॉल टेक्नॉलॉजी आणि XiaoAI बिल्ट-इनसह असू शकते.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30szS8s

Comments

clue frame