चांद्रयान २: विक्रम लँडरशी संपर्क साधण्याच्या आशा धुसर

बंगळुरूः मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून () हा संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दिवस पुढे जात आहेत, तसे विक्रम लँडरशी संपर्क होण्याच्या आशा हळूहळू धुसर होत चालल्याचे चित्र आहे. विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे अखेरचे प्रयत्न इस्रोकडून केले जात आहेत. विक्रम लँडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यावर त्यातून बाहेर पडले असते आणि शास्त्रज्ञांचा हेतू सफल झाला असता. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या उद्देशाने विक्रम लँडरची रचना करण्यात आली होती. यामध्ये असलेल्या रोव्हरचे जीवनमान एका चंद्र दिवसाचे म्हणजेच पृथ्वीवरील १४ दिवसांऐवढे आहे. ७ सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरण्याच्या प्रक्रियेत २.१ कि.मी.वर असताना विक्रम लँडरचा इस्रोशी असलेला संपर्क तुटला. त्यामुळे आता संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रोकडे केवळ एका आठवड्याचा कालावधी राहिला आहे. आगामी १४ दिवसांपर्यंत विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा निर्धार इस्रोने केला होता. दिवस पुढे जात आहेत, तसे विक्रमशी संपर्क साधण्याचे काम अवघड होत चालले आहे. बॅटरीमधील उपलब्ध ऊर्जा संपत चालली असेल. यामुळे तासागणिक विक्रमशी संपर्क साधण्याची शक्यता धुसर होतेय, असे इस्रोमधील एका शास्त्रज्ञाने सांगितले. दरम्यान, चांद्रयान-२ मोहिमेतील नियोजित जागेच्या जवळ उभा आहे. त्याचे नुकसान झालेले नाही. विक्रमने हार्ड लँडिंग केले आणि ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने जे छायाचित्र पाठवले आहे, त्यानुसार ते तुटलेले नाही, अशी महिती इस्रोकडून अलीकडेच देण्यात आली. त्यामुळे विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याच्या आशा पल्लवित झाल्या. अमेरिकेच्या नासा संस्थेकडूनही इस्रोसाठी मदतीचा हात पुढे आला. नासानेही विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत 'हलो' मेसेज पाठवला.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZXoEsR

Comments

clue frame