व्हॉट्स अॅपवर एन्क्रिप्टेड मेसेज पण वाचतात हॅकर्स!

मुंबई: व्हॉट्स अॅपवर युजर्सना एक इशारा देण्यात येत आहे. अॅपल डिव्हाइस युजर्सना अद्ययावत iOS अपडेट इन्स्टॉल करण्याचा सल्ला दिला जात आहे, जेणेकरून सायबर क्राइमच्या जाळ्यात कुणी अडकणार नाही. व्हॉट्स अॅपचा मोठा युजरबेस सध्या सायबरक्रिमिनल्सच्या निशाण्यावर आहे. व्हॉट्स अॅप जगातलं सर्वात प्रसिद्ध चॅटिंग अॅप आहे आणि फेसबुकच्या मालकीच्या या अॅपचे जगभरात १५० कोटीहून अधिक युजर्स आहेत. यामुळेच कोणत्याही फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सूचना युजर्सना केल्या जात आहेत. व्हॉट्स अॅप वर मेसेज एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असल्यामुळे मेसेज पाठवणारा आणि तो रिसिव्ह करणारा यांच्याव्यतिरिक्त कुणी तिसरी व्यक्ती मेसेज वाचू शकत नाही. पण एका नव्या व्हायरसमुळे हॅकर्स आता व्हॉट्स अॅपचे एनक्रिप्टेड मेसेजही वाचू शकतात असा दावा केला जात आहे. त्यामुळेच युजर्सना iOS अपडेट करण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र अॅपलकडून या व्हायरसची समस्या सोडवली असल्याचं बोललं जात आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2knbhyE

Comments

clue frame