नवी दिल्लीः सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अॅमेझॉननं ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलचं आयोजन केलं आहे. २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना विविध वस्तूंवर घसघशीत सूट मिळणार आहे. स्मार्टफोन, फॅशन, इलेक्ट्रोनिक प्रोडक्ट यांवर ऑफर्स मिळणार आहेत. एसबीआयच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल. स्मार्टफोनवर ४०% सूट अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्टफोनवर ४० टक्के सूट मिळेल. याचबरोबर, सेलमध्ये कॅशबॅक, एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट इएमआय, फ्री रिप्लेसमेंट, एक्सचेंज ऑफर्स असणार आहे. त्याचबरोबर, १००पेक्षा जास्त स्मार्टफोनवर ऑफर आहेत. सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो आणि विवोवर ऑफर्स व ६,००० पर्यंत एक्सचेंज ऑफर दिली आहे. टीव्हीवर ७५ टक्के सूट सेलमध्ये टीव्ही आणि इलेक्ट्रोनिक वस्तूंवर ७५ टक्के सूट मिळेल. फ्री- डिलीव्हरीसोबत इन्स्टोलेशनचीही सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. अॅमेझॉन सेलमध्ये ८३३ रुपये नो-कॉस्ट इएमआयवर टीव्ही खरेदी करता येणार आहे. याचबरोबर ६९५ रुपयांच्या नो-कॉस्ट इएमआयवर वॉशिंग मशीन खरेदी करण्याची संधी आहे.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VdiOhH
Comments
Post a Comment