शाओमीनं भारतात लाँच केले चार टीव्ही

नवी दिल्लीः चीनी कंपनी शाओमीनं भारतात ४ नवीन लाँच केले आहेत. मंगळवारी शाओमीच्या स्मार्टर लिव्हिंग २०२० इव्हेंटमध्ये लाँच केले आहेत. शाओमीनं ६५, ४३ आणि ५० इंच अशा तीन वेरियंटमध्ये एमआय टीव्ही ४एक्स तर, ४०इंचाचा एमआय टीव्ही ४ए लाँच केला आहे. त्याचबरोबर शाओमीनं साउंड बार सुद्धा लाँच केला आहे. १७,९९९ रुपयांपासून सुरुवात शाओमीनं त्यांच्या एमआय टीव्हीची किंमत १७,९९९ पासून सुरू आहे. तसंच ब्लॅक वेरियंटची किंमत ४,९९९ रुपये आहे. ६५ इंच टीव्ही- ५४, ९९९ रुपये ५० इंच टीव्ही- २९,९९९ रुपये ४३ इंच टीव्ही- २४,९९९ रुपये ४० इंच टीव्ही- १७,९९९ रुपये शाओमीचा सर्वात बेस्ट टीव्ही शाओमीनं ६५ इंचाचा एमआय टीव्ही ४एक्स लाँच केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा टीव्ही भारतातील आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि बेस्ट एमआय टीव्ही आहे. या टीव्हीत एमआयच्या इतर टीव्हीच्या तुलनेत ४०% अधिक सर्फेस एरिया आहे. शाओमीनं या टीव्हीत नेटफ्लिक्सला अॅड केलं आहे.हा व्हिव्हिड पिक्चर इंजिनसोबत येणारा पहिला टीव्ही आहे. टीव्हीत अल्ट्रा- स्लिम बेजल डिजाईन, डॉल्बी ऑडियो आहे. हा टीव्हीत अँड्रोइड ९.० फिचर आहे. डेटासेव्ह फिचरसोबत लाँच होणार ६५ इंचाचा टीव्ही ६५ इंच टीव्हीत नवीन २०w स्पीकर्स देण्यात आले आहेत. टीव्हीत क्वॉड-कोर कॉर्टेस ए-५५ प्रोसेसर असेल. तसंच या अँड्रोइड टीव्ही डेटा सेव्हरसोबत लाँच होणारा पहिला टीव्ही आहे.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LVoXdZ

Comments

clue frame