'फर्स्ट डे फर्स्ट शो' मुळे मल्टीप्लेक्सला धोका?

मुंबई: भारतात मनोरंजनाचं नवं माध्यम नेहमी थिएटरच्या व्यवसायाआड येतं असं म्हणतात. आता नुकतीच ज्याची घोषणा झालीय त्या जिओच्या '' मुळेही थिएटरवाल्यांचे धाबे दणाणले असल्याचं म्हटलं जात आहे. पण 'फर्स्ट डे फर्स्ट शो' मुळे मल्टीप्लेक्सला धोका नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. 'फर्स्ट डे फर्स्ट शो' ही प्रिमीयम सेवा घेणाऱ्या ग्राहकांना नवा सिनेमा प्रदर्शित होण्याच्याच दिवशी आपल्या घरीदेखील पाहता येणार आहे. याचा मल्टीप्लेक्सना धोका नाही, असं जे सांगितलं जात आहे, त्यामागचं कारण आहे या विशेष सेवेचं शुल्क. 'फर्स्ट डे फर्स्ट शो' या प्रिमीयम सेवेचं शुल्क २,४९९ ते ८,४९९ रुपये प्रति महिना आहे. यात विविध तीन ऑफर देण्यात आल्या आहेत. परिणामी या सेवेची मागणी केवळ श्रीमंत वर्गातील काही थोड्या ग्राहकांकडूनच येऊ शकेल. परिणामी 'फर्स्ट डे फर्स्ट शो'मुळे मल्टीप्लेक्सच्या व्यवसायावर परिणाम होणार नसल्याचं म्हटलं जात आहे.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34OLW3d

Comments

clue frame