मुंबईः चायनीज कंपनी वनप्लसचा बहुप्रतिक्षीत लवकरच भारतात लाँच होणार आहे. या टीव्हीची लाँचिग डेट अद्याप कंपनीकडून जाहीर करण्यात आली नसली तरी अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये या टीव्हीचा सेल सुरू होण्याची शक्यता आहे. अॅमेझॉननं प्रदर्शित केलेल्या एका टीझरमध्ये न्यू लाँचिग सेक्शनमध्ये वन प्लस टीव्हीचा लोगो दिसत आहे. त्यानुसारचं अॅमेझॉनच्या सेलबरोबरच स्मार्ट टीव्हीचा सेल सुरू होण्याचा अंदाज बांधला जात आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन सेल २९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळं, अॅमेझॉनचा फेस्टिव्हल सेलही त्याचदरम्यान सुरूहोण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अनेक कंपन्यांनी त्यांचे नवीन प्रॉडक्ट अॅमेझॉन सेलमध्ये रिलीज केले आहेत. वनप्लस टीव्हीचे स्पेसिफिकेशन वनप्लस टी.व्हीमध्ये ओएलइडी पॅनल नसणार असं सांगण्यात येत आहे. एका अहवालानुसार, वनप्लस टीव्ही ४३, ५५,६५ आणि ७५ इंच वेरियंटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. या टीव्हीचा हाय-एंड वेरियंट 4kHDR डिस्प्लेला सपोर्ट करणार.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Q8fHZo
Comments
Post a Comment