डेटा म्हणजे तेल नव्हे!; अंबानींना फेसबुकचे उत्तर

नवी दिल्ली: सध्याच्या काळात म्हणजे तेल असल्याचे वक्तव्य रिलायन्सचे मुकेश अंबानी यांनी केले होते. मात्र, त्यांचे हे वक्तव्य फेसबुकला फारसे रुचले नसल्याचे समोर आले आहे. डेटा म्हणजे तेल नव्हे तर पाणी असल्याची प्रतिक्रिया फेसबुकचे पब्लिक पॉलिसीचे प्रमुख निक क्लेग यांनी म्हटले आहे. तंत्रज्ञानाच्या काळात सध्या डेटाला प्रचंड महत्त्व आले आहे. अनेकांचा ओढा डेटा जमवण्याकडे असतो. मात्र, फेसबुकच्यादृष्टीने डेटा हे पाणी आहे. भारतासारख्या देशाने हा पाणीरुपी असलेल्या डेटाचा प्रवाह जमवून ठेवता सीमोल्लंघन करत प्रवाहीत करायला हवा असे मत निक क्लेग यांनी व्यक्त केले. डेटा हा तेलाचा साठा आहे आणि त्यात वाढ करून प्रगती करू शकतो असा कोणी विचार करत असेल तर हे चुकीचे असल्याचे मत क्लेग यांनी व्यक्त केले आहे. डेटा हा तेलसाठ्यासारखा संपणारा नसल्यामुळे त्याचा मालक बनून व्यापार करता येईल ही समजही चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे डेटाची तुलना ही पाण्याशी करणे योग्य असून ग्लोबल इंटरनेट ही समुद्रासारखी प्रवाही असून त्याला सीमा नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकारच्यावतीने डेटा प्रोटेक्शन विधेयक तयार करण्यात येत आहे. यामुळे भारतीय नागरिकांचा डेटा हा भारतात स्टोर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. परदेशी कंपन्यांना भारतात डेटा सेंटर सुरू करावा लागणार असल्यामुळे त्यांनी या प्रस्तावित विधेयकाविरोधात सूर आवळण्यास सुरुवात केली आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31lvB3x

Comments

clue frame